रंगबिरंगी नदी फुलांची वहात आहे
काठावरची हिरवाई ती पहात आहे
बुडी मारुनी पुष्पांमध्ये बुडून जावे
अश्या आगळ्या विचारात मी नहात आहे
निळसर कुसुमे दाट निळेपण कुठे चालले
शुभ्र गुलाबी बुके त्यातही वहात आहे
तशीच काही तरल गझल मम मनात माझ्या
बनून कविता पुढे पुढे बघ वहात आहे …