मी जेंव्हा लहान होते;
तेंव्हा आईसुद्धा लहान होती
माझ्यासारखीच दादांसाठी
भाजीभाकरी करीत होती…
आई जेंव्हा परी होती
चित्रासारखी सुंदर होती!
तेंव्हाच मी शिकले… चित्र काढायला
आणि दादा शिकले
चित्रात रंग भरायला
आणि भाऊ बहिण शिकले खदखदून हसायला
हा! हा! हा!
मग आई शिकली वाचायला
आणि लिहायला, गायला…
मग जेंव्हा आई गोष्टी लिहायला लागली
तेंव्हा दादा वाचक झाले
वाचता वाचता लेखक झाले;
त्यांनी मग एक पुस्तक लिहिले
मग मी ते पुस्तक इतक्यांदा वाचले
इतक्यांदा वाचले कि ते मला तोंडपाठ झाले…
पण पुस्तक मात्र पूर्ण निखळले
फाटून गेले…
मग दादांनी ते परत लिहिले
आणि आईने त्याला कव्हर घातले…
अश्शी आई हुश्शार होती
कवितेमधला मुक्तछंद होती
दादांची पण … गझल होती