गझल काफिया रदीफ गातो
माझ्यासंगे शरीफ गातो
उत्सव असुदे अथवा जलसा
तीन दले धर्माला पळसा
गजल लिहावी अथवा कविता
शुद्ध जले वाहूदे सरिता
गझल गझाला गज्जल असुदे
नीर तयातिल नीतळ असुदे
साळुंकी वा म्हण साळुंखी
फक्त जाण तू तो तर पक्षी
सुंदर देही सुंदर आत्मा
हेच सांगते गाता गाता
गाणे गाता बाग फुलावी
शिंपुन केसर ती रुजवावी
दवात भिजल्या अक्षरओळी
हलकी वाटे आता मोळी
ओझेबीझे फेकुन देते
प्रसन्न मन मी देते घेते
प्रेम ‘सुनेत्रा’वर मी करते
कधी बिघडते घडीत घडते