संदीप खरे यांच्या
नसतेस घरी तू जेव्हा’ या सुंदर भावपूर्ण कवितेवर
हे सहज सुचलेले विडंबन
नसतात घरी हे जेव्हा…
मी चॅटींग करीत बसते
दाराशी चाहूल ह्यांची
मी त्वरीत ऑफलाईन होते
येतात घरी हे जेव्हा…
मग जेव्हा वाजे बेल
अंतरी साठवित बोल
मोबाइल मौनी होतो
मी हसून उघडे दार
येतात घरी हे जेव्हा …
सय मला तुझी रे येते
बघ जेव्हा अधुनी मधुनी
हे मला डिनरला नेती
मम गझला वाचत बसती
मी रडते जेव्हा जेव्हा ….
तव रम्य स्मृतींच्या स्वप्नी
मी बुडून जाते जेव्हा
हे हसून मजला म्हणती
तू किती गं सुंदर अजुनी…
तू किती गं सुंदर अजुनी …
मग तुला विसरुनी जाते
म्हणतात हसुन हे जेव्हा….