भाषारूप नि रूप अभाषा, यांच्याद्वारे शब्द उमटती..
शब्दाशब्दामधले अंतर, अंतरात त्या भाव प्रकटती…
भाषारुप शब्दांच्यामध्ये, अक्षररूपी मनुष्य बोली..
चिव चिव बें बें खग नि पशूंची, रूप अनक्षर उपजत बोली…
रुपी अभाषा स्वरुप शब्द दो, प्रायोगिक अन स्वाभाविकही..
पुदगल शब्दांचेच भेद हे, चर्चा करता पर्यायाची…
मनुज छिन्नीने दगड फोडतो, ध्वनी उमटतो, तो प्रायोगिक..
मेघ वीज वा निर्झर यांचे, शब्दध्वनी जे, ते स्वाभाविक…
पुरुष प्रयत्नाने जो उमटे, शब्दध्वनी तो, म्हण प्रायोगिक..
निसर्गात जे स्वयं उपजती, वैस्रसिक वा, ते स्वाभाविक…
मात्रावृत्त – १६+१६=३२ मात्रा