पुदगल द्रव्याची गुणचर्चा करते स्वरुप विचार
संक्षेपाने विचार करता त्याचे चार प्रकार
त्या चारांचे सुद्धा पडती आणखी उपप्रकार
विस्ताराने विचार करता होती वीस प्रकार
स्पर्श रस अन गंध वर्ण युक्त असते पुदगल द्रव्य
म्हणून त्यांचे महत्व असते जीव जाणती भव्य
स्पर्शनइंद्रिय यांच्या द्वारे जाणावा गुण स्पर्श
चार युगलांमध्ये बसवूत त्यांचे आठ प्रकार
चिकट सुकट नि गरम गार नि जड हलका मृदू कठोर
जोड्यांद्वारे सहज स्मरावे आठी नित्य प्रकार
रस गुण पुदगल द्रव्याचे या जाणे इंद्रिय जीभ
मधुर कडू अन तुरट तिखट अन आंबट पाच प्रकार
घ्राण इंद्रियाद्वारे जाणू पुदगल गंध गुणास
सुगंध आणिक दुर्गंधाला अचुक जाणते नाक
नेत्र जाणती वर्ण रुपाला त्यांचे पंच प्रकार
कृष्ण नील अन लाल पीत अन धवल वर्ण ते पाच
मात्रा २७