पुदगल द्रव्याचा जाणू पंचम पर्याय
नाम तयाचे संस्थानं वाच पुढे काय
संस्थानाचे नाव दुजे आहे आकार
आकाराने होत असे रूपे साकार
इत्थं लक्षण संस्थाना म्हणती पहिला प
अनित्य लक्षण संस्थान प्रकार दुसरा दु
लांब रुंद गोल कोनयुत कितीक आकार
वर्णन करण्या सहजपणे होती साकार
मेघ नभातिल बाष्पाचे नियमित ना रूप
अशक्य करणे वर्णनही अनियमितच रूप
सहज सहजी वर्णाया प्रकार हा प्रथम
वर्णन करण्या सहज नसे प्रकार तो द्वितिय
पंचम पर्यायाची चर्चा रंगत खुलली ग
प्रसाद खाण्या बालचमूची पंगत बसली ग
मात्रा २३