भूत भविष्य नि वर्तमान रे
यांचा क्रम तू नीट लाव रे
वर्तमान ज्यांचा रे सुंदर
भविष्य त्यांचे सुंदर सुंदर
भूत ही ज्यांचा अतीव सुंदर
वर्तमान पण निश्चित सुंदर
वर्तमान जर नसेल सुंदर
कर्तव्याचे पालन तू कर
नको उसासा अन सुस्कारा
शिक्षा मिळते कामचुकारा
भूतांमधल्या दोषांवरती
नको कुरकुरू जगण्यावरती
चुकांमधूनी शिकत रहा तू
वर्तमानि या घडत रहा तू
मात्रावृत्त – १६ मात्रा