अध्यात्माच्या गाथा सुंदर फक्त पाठ ना केल्या मी
वाच्यार्थाला जाणुन त्यांच्या अनुवादित ही केल्या मी
जाणुन घेउन वाच्यार्थाला अनुभवसुद्धा घेते मी
मनापासुनी तपात रमते मौन रम्य अन घेते मी
गूढ बोलुनी मूढ बनोनी कुणी मोकळे होते हो
दिवस लोटता शल्य तयांच्या अंतर्यामी टोचे हो
पोपटपंची ना मी करते पोपटास पण मुक्त करे
गुरुवर आच न येण्यासाठी आगीमध्ये भक्त शिरे
भक्त भक्ति अन आत्मशक्तिचे किती मनोरम नाते हे
फितूर भ्याडांना टिपण्या मम नजर दुधारी पाते हे
मात्रावृत्त (१६+१४=३० मात्रा)