काय लिहू कसे लिहू प्रश्न मला पडत नाहीत
लिहिणे चालू झाल्यावरती शब्द कुठेच अडत नाहीत
तीच तीच रडकथा गाणे मला आवडत नाही
नवे काही लिहिण्यासाठी आतुर माझे कलम शाई
कोण काय अर्थ काढेल याची कधीच पर्वा नसते
एका वेगळ्या विश्वामध्ये काव्य माझे झुलत असते
भाव दाटतात रूप घेतात लिहित लिहित रंग बरसतात
लिहून झाल्यावरती मात्र हृदय मोकळे करून जातात
आभाळ पुन्हा निरभ्र होते त्यात पाखरे उडत राहतात
पंखावरती त्यांच्या बसवून स्वर्गामध्ये फिरवुन आणतात
किती शब्द किती ओळी मोजून लिहिणे जमत नाही
कुणी शिव्या घातल्या तरी लिहिल्याशिवाय राहवत नाही