मी जादुई कांडी आहे..
तीन रत्नयुत दांडी आहे…
मम झेंड्याची शान तिरंगी ..
हाती माझ्या फूल सुरंगी…
शब्दांमध्ये मिठास माझ्या..
गाण्यामध्ये सुहास्य माझ्या…
अंकांचा ना प्रभाव मजवर..
प्रभाव माझा रे अंकांवर…
हा ना माझा इगो अहंपण..
हे तर आत्म्याचे कर्तेपण…
सर्व अंक अन सर्व अक्षरे..
झुकून मज रे करिती मुजरे…
उभी येथ मी दृढ श्रद्धेने..
मीच “सुनेत्रा” नयन देखणे…
कवयित्री — सुनेत्रा (Sunetra)