मैत्री अपुली इतुकी सुंदर मित्र-मैत्रीणीनो
मैत्रीचा ही रम्य झोपडी मित्र-मैत्रीणीनो
बघा वाहते झुळझुळणारे सुगंध भरले वारे
स्मरती सारे रम्य आपुले दिस सारे प्यारे
मैत्रीसाठी ठेवीन माझा प्राण तराजूमध्ये
एकी आणि विश्वासाचे नाते मैत्रीमध्ये
नकाच परके म्हणू इथे कुणा हीच खरी मैत्री
जात धर्म अन प्रांत देशही म्हणती मैत्री खरी
जरी न भेटतो रोज रोज पण हृदयी प्रेम खरे
काव्यामधुनी त्या प्रेमाची अविरत धारा झरे
इस्पिक किलवर बदाम चौकट सारी पाने खरी
जोकरसुद्धा खराच आहे नका करू मस्करी
मिळतील पाने जी खेळात त्यावर खेळू डाव
खरेपणाने जिंकून आणू सारी अपुली शान
समाधान संतोष असावा हृदयामध्ये सदा
हातामध्ये तुझ्या “सुनेत्रा”लेखणीच ही गदा