आम्ही वेताळ वेताळ
जोडू आकाश पाताळ
पोसू नारळ बागांना
करत काम नि धिंगाणा
नारळ विकून बाजारी
फेडू मागची उधारी
मस्तीत दावत तेगार
घालू पालथा बाजार
पायपूसणी मोलाची
खऱ्या प्रीतिच्या तोलाची
बाजारी विकत घेउया
डोंगरी झऱ्यात धुवूया
कुटाळ कर्मे जाळूया
धर्म दिगंबर पाळूया
जंगल पाताळ बाजार
समुद्र आकाश शेजार
सुंदर शेजी शेजारी
कटेल खोटा व्यापारी
मात्रा-१४