कमलासनात लक्ष्मी.. पद्मावती देवी…
खळाळणारा झरा.. प्रपातातही देवी….
गणेशरूपी ऋद्धी.. मंतर गुणी सिद्धी
घडा जलाने भरते.. जिंकुनी घन युद्धी
ङ्ग् वांङ्मय जणु चंद्रमा.. मूर्त कैवल्याची
कमलासनात लक्ष्मी …………कमलासनात लक्ष्मी …………
चरखा फिरतो गरगर.. सूत कातण्या छान
छबी आरशातली.. पाहुनी गोरी पान
जटाभार डोंगरी.. त्यातून ठिबके नीर
झरा बनुनी धबधबा.. सांडतो धवल क्षीर
ञ ञकार हे अधिपती.. आहे चाफा पीत
कमलासनात लक्ष्मी . … … …… कमलासनात लक्ष्मी …………
टरबुजे पिकवतात.. वाळूत नदीकाठी
ठसे उमटती तेथ.. त्यांचेच नदीकाठी
डब्यात भरते नार .. नीर प्यावयासाठी
ढग कृष्ण दाटलेत.. मस्त वर्षण्यासाठी
ण बाणातिलवीज.. लक्ष्य भेदण्यासाठी
कमलासनात लक्ष्मी ………… कमलासनात लक्ष्मी
तलवार लेखणीची.. मी ऐसी फिरवून
थरथरवीन पापांस.. अक्षरांस गिरवून
दशलक्षण पर्वात .. आत्म्यात मन रमवून
धन प्रेमाचेच मिळे.. धनज्ञान वाटून
नवलाई घडवून.. गाईन मन खुलवून
कमलासनात लक्ष्मी ………… कमलासनात लक्ष्मी …………
प पतंग उडणारा.. हातात दोर माझ्या
फ फकीर फिरणारा.. माझ्यासम गाणारा
बलवान शूर वीर.. आहेच पुत्र गुंडा
भय संपलेय सारे.. कन्या अभय होता
महावीर तीर्थङ्कर.. त्यास नमोस्तु अमुचा
कमलासनात लक्ष्मी ………… कमलासनात लक्ष्मी …………
यमराज अता कोणा.. ना अल्पायु ठेवी
रमण्यास जीवनात.. जीवांना सुख देई
ललकार करी प्रीत.. मोक्ष मिळाया आई
वटवृक्षावर गाती.. खग मनमधुर गाणी
शरद ऋतूची जादु.. पसरे ठाई ठाई
कमलासनात लक्ष्मी ………… कमलासनात लक्ष्मी …………
षट्कार ठोकण्या हा..फलंदाज भारी
समईच्या ज्योतीत..उजळली धरा सारी
हलधर आनंदात..बसलाय गात दारी
ळ बाळरूप करते..नाचत नाचत वारी
क्षमाशील यक्षिणी..करात तिचिया झारी
ज्ञकार अक्षर ज्ञानी..प्रसाद शुद्ध चारी
कमलासनात लक्ष्मी ………… कमलासनात लक्ष्मी …………
पद्मावती देवी … …. …. …. पद्मावती देवी … …. …. ….