पदर रेशमी काठ जरी
कसा आवरु घोळ जरी
तिन्हीसांजेला पाझरती
आठवणींचे लोट जरी
शिकून घ्यावी मनभरणी
भरले नाही पोट जरी
हौस सदा मज लिहिण्याची
लिहिते ठणके बोट जरी
पुरे जाहले ना वाटे
भरली आहे मोट जरी
विकत आणते तिळगूळ ग
जवळ दहाची नोट जरी
खरे वागणे प्रिय प्रिय रे
कुरवाळे मी खोट जरी
गझल मौक्तिके उधळे मी
ना मज मिळते वोट जरी
हवी हवीशी शाल निळी
कृष्ण मिळाला कोट जरी
फांद्या झुकल्या नोटांनी
झाड सरळ अन सोट जरी