-
पंचपरमपद – PANCH-PARAM-PAD (“The five supreme states”)
उत्तम दशगुण धर्म जाणती मुनी दिगंबर उत्तमतेचे मर्म जाणती मुनी दिगंबर चौविस तीर्थंकर जैनांचे जैन मंदिरी उत्तम अवघड कर्म जाणती मुनी दिगंबर द्रव्यलिंग अन भावलिंग युत पंचपरमपद उत्तम त्यांचे घर्म जाणती मुनी दिगंबर काळे गोरे भुरे गव्हाळी अनंत निवडक उत्तम अस्सल चर्म जाणती मुनी दिगंबर अंगांगावर ठेवायाला बोट कसेही उत्तम कुठले वर्म जाणती मुनी दिगंबर…
-
जिनबिंब – JINBIMB (image of lord jina)
अकिंचन्य धर्माच्या दिवशी झळाळले जिनबिंब अंतरी जळात विहिरीमधल्या हलतो भावुक होउन लिंब अंतरी सान प्रतिक हे अपरिग्रहाचे हवी तेवढी त्रिज्या घेउन भवती अपुल्या भूमी मापे केंद्रक बनुनी टिंब अंतरी काळ्या मेघी पाहुन डोळे नितळ साजिरे मायपित्याचे सर कोसळली सरसर सरसर झाली सृष्टी चिंब अंतरी मुक्तक तीन शेरांचे… मात्रावृत्त (मात्रा ३२)
-
भारत भूमी – BHARAT BHUMI (mother land India)
भारत भूमी माता माझी जिनानुयायी पिता भारत भूमी मारे बाजी जिनानुयायी पिता धर्म अहिंसा हृदयामध्ये जपण्यासाठी सदा भारत भूमी लढण्या राजी जिनानुयायी पिता मिया नि बीबी असता राजी लग्नासाठी जिथे भारत भूमी होते काझी जिनानुयायी पिता वृद्ध जाहली जरी वयाने कुंतल पिकले जरी भारत भूमी सदैव ताजी जिनानुयायी पिता कटू विषासम सत्य पचवुनी जगण्यासाठी पुन्हा…
-
नाद अनाहत – NAD ANAHAT (uncreated sound)
क्षमा धारणे मार्दव येते हृदय भिजविते मन वचने कृति यात सरलता शौच प्रकटते आत्ममंदिरी नाद अनाहत मधुर बरसण्या अंतर्यामी शिवरुप सुंदर सत्य झळकते धूप सुगंधी मम् कायेचा संयम धर्मी तपोधुनीने यज्ञी जाळुन काम त्यागते भाव आप पर संसाराची करता वृद्धी त्यास त्यागुनी अकिंचन्य मी खरे जाणते उरता सात्त्विक प्रेम न उरता देहासक्त्ती ब्रह्मचर्य त्या निर्मल…
-
खाई – KHAAEE (chasm)
ही तर सुंदर सुडौल मोहक तरुण मनाची बाई आहे आई आहे पूर्ण नार ही विजेप्रमाणे कडाडणारी घाई आहे आई आहे सुजला सुफला मम् गझलेच्या जमिनीमध्ये अक्षरबीजे पेरायाला लेखणीतुनी टपटपणारी ही झरणारी शाई आहे आई आहे शुभ्र सरोवर राजहंस अन लहरींवरती टपोर कमळे अशी मनोरम गर्द गारवा पांघरलेली ही आंब्याची राई आहे आई आहे मस्त काफ़िये…
-
ममता – MAMTA (love of mother)
जपात रमले ध्यानी रमले तप केले मी शब्द जाळुनी राख जाहली मम् कर्मांची भाव भावना काव्य जाळुनी हृदय जाहले शांत जलासम बिंब प्रकटले सुंदर माझे आत्मस्वरूपी मग्न जाहले छळणारा मी भूत जाळुनी गाळ साठला तळी जलाच्या ओंजळ भरते शुद्ध जलाने नकाच फेकू दगड चुलीचे तुष्णा मिटली काष्ठ जाळुनी जात पात इतुकी ना मोठी त्याहुन मोठे…
-
चुंबक – CHUMBAK (magnet)
जादुई शब्दात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे जादुई काव्यात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे जे हवे ते मिळविण्या मी कोष विणते भावनांचा जादुई कोषात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे नेणिवेतिल स्वप्न अंबर ओतते राशी धनाच्या जादुई स्वप्नात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे देह माझा एक चुंबक खेचुनी घेई सुखांना जादुई आत्म्यात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे मी “सुनेत्रा” जाणतेकी ही…