-
चिमटे – CHIMATE
आयुष्याची सुंदर गाथा स्वतः लिहावी अनाथांसही करण्या नाथा स्वतः लिहावी चिमटे सोसत समीक्षकांचे गोष्ट छानशी स्वतः स्वतःच्या खाउन लाथा स्वतः लिहावी संतांसम मिळवाया शांती अंतरातली अभंग ओवी झुकवुन माथा स्वतः लिहावी ताल सुरातिल धरुनी ठेका गझल लयीतिल जपता जपता तै तै ताथा स्वतः लिहावी मायपित्यांसम गुरू मिळाया व्यथा टोचरी पदपथ अथवा बनवुन पाथा स्वतः लिहावी…
-
पट्टा – PATTAA
-
निरामय – NIRAAMAY
सुदृढ सुंदर शुद्ध निरामय जीवन सळसळणारे अमुचे अंतरातल्या मधुर क्षणांचे गायन सळसळणारे अमुचे सत्य अहिंसा प्रेम धबाबत हृदयामधुनी उसळत आहे तन मन वचनामधून मंजुळ वादन सळसळणारे अमुचे अभय जाहलो अभय कराया जीव भद्र मोक्षाचे मार्गी हरेक माध्यम काबुत ठेवे शासन सळसळणारे अमुचे बदल घडावा बदल टिकावा स्वधर्म सत्याचा टिकण्याला गुणानुरागी वारे वाहे पावन सळसळणारे अमुचे…
-
पल्लेदार – PALLEDAAR
-
जिवाशिवाचे मीलन – JIVAA SHIVAACHE MEELAN
सह्याद्रीच्या डोंगररांगांतुनी धबाबा धबाबणारा प्रपात सुंदर प्रेमावेगाने कोसळतो शुभ्र खळाळत खळाळणारा प्रपात सुंदर अवखळ मारुत प्रचंड ऊर्जेने भरलेला जलौघास आलिंगन देता पंख पसरुनी हटून मागे त्यास चुंबतो भरारणारा प्रपात सुंदर पंचभुतांच्या जिवंत गात्री उदकांतिल संवेग वायुचा प्रीत तोलता जिवाशिवाचे मीलन होता अखंड दौडे उधाणणारा प्रपात सुंदर गर्जत उसळत अन फेसाळत दरीस भेटे कड्यावरुन झेपावत खाली…
-
घर – GHAR
-
गंधोदक – GANDHODAK