Category: Ghazal

  • पुणे – PUNE

    सिटी पुणे जसे तसे असेन मस्त स्मार्ट मी सिटीत पिंपवड जसे जगेन मस्त स्मार्ट मी सिटीत पिंपवडमधे सुजाण माणसे खरी तयातले कवीगुणी स्मरेन मस्त स्मार्ट मी वरून पिंपरी जरी जहाल खूप वाटते तिच्यामधील मार्दवा जपेन मस्त स्मार्ट मी सचैल चिंचवड पुरे भिजून चिंब पावसी तसेच पावसात या लिहेन मस्त स्मार्ट मी जलात नाच नाचती मयुर…

  • भीजपाऊस – BHEEJ PAAOOS (steady gentle rain, drizzle)

    भीजपावसा अता भिजव मृत्तिका गावयास सावळी तलम मृत्तिका मृत्तिकेस बावऱ्या रंग लाव तू रंगल्यावरी घटास भरव मृत्तिका दाटल्या नभापरी वस्त्र जांभळे नेसवून घाटदार घडव मृत्तिका डौलदार चालते वीज प्राशुनी वाटते जणू सुरा सजल मृत्तिका गझल गात शिंपते चांदणे जळी वाहतेय सुंदरा तरल मृत्तिका गझल अक्षरगणवृत्त (मात्रा १९) लगावली – गालगालगालगा/गालगालगा/

  • दिलको दिलने छू लिया – DILAKO DILANE CHHOO LIYAA

    जिंदगीका है भरोसा दिलको दिलने छू लिया छा गया दिलमे उजाला दिलको दिलने छू लिया बुझ गयी वाती दियेकी ना मिली माचीस मुझे खुद दिया वो जलने लगा दिलको दिलने छू लिया बन गयी बंजर जमी ये उड गये बादल तो क्या बरसता है खुद आसमा दिलको दिलने छू लिया गुफतगू करने लगे जब डालपर…

  • भृंग – BHRUNG

    पैंजणात कंकणात वाज वाज तू शीळ घाल मुक्त गात नाच नाच तू रंगरूप साजिरे तुझे फुलापरी चुंबताच भृंग हो ग लाल लाल तू वेगवेगळ्या तुझ्या कलांस दावुनी चांदण्यात भीज आज चिंब चिंब तू ओळखून वृत्त मधुर प्राश रक्तिमा रंगवून ओठ ओठ गाल गाल तू गर्द कंच रान नील मोर नाचतो लेखणीस धार लाव मस्त मस्त…

  • स्वीकार – Acceptance

    अक्षरातल्या कळ मंत्रांनी कथा फुलांच्या उमटत गेल्या वारीच्या घाटात सुरांनी कथा फुलांच्या उमटत गेल्या पुष्पपऱ्यांच्या हुंकारांनी कथा फुलांच्या उमटत गेल्या अत्तरदर्दी व्यापारांनी कथा फुलांच्या उमटत गेल्या मालवल्यावर समया साती देवघरातिल वेदीवरच्या खोल जलातिल अंधारांनी कथा फुलांच्या उमटत गेल्या मंदिरातुनी निनादणारा मधुर नाद घंटेचा ऐकत णमोकारमय अक्षरातुनी कथा फुलांच्या उमटत गेल्या शशधर उगवे बीजेचा अन ओवाळाया…

  • ऋषभदेव – RUSHABH DEV

    अयोग्य काही केले मी जर जाणवले मजला स्वीकारुन मी केले सुंदर जाणवले मजला काळ्या काळ्या नेत्री काजळ घालुन मी बघता चांदण भरले जळले अंबर जाणवले मजला वृषभ जयाचे लांच्छन तो तर ऋषभदेव शंभू आदिनाथ पहिला तीर्थंकर जाणवले मजला सत्यशोधनासाठी होता पंचम काळी पण महावीराचा आत्मसंगर जाणवले मजला दवबिंदूंची स्फटिकमण्यांसम करी माळ येता शंकर शंकर जपतो कंकर…

  • दक्ष – DAKSH (adept)

    शुद्ध आत्मा दक्ष “मी” मन न्हात येते जे हवेसे वाटते ते गात येते “आत्महित आधी करावे ” सांगुनीया मोरपीशी लेखणी हातात येते भय अता कुठलेच नाही देत ग्वाही काव्य सुंदर रंगुनी प्रेमात येते चांदणे कोजागिरिचे बरसताना भावनांनी चिंबलेली रात्र येते वाचलेले दर्शनाने जाणलेले ज्ञान सम्यक चाखण्या पानात येते गझल अक्षरगणवृत्त (मात्रा २१) लगावली – गागालगा/…