Category: Ghazal

  • फँटसी – FANTASY

    वाहती ओसंडुनी मम भावना हृदयातुनी प्रेमधन मिळतेच मज मग नाचऱ्या विश्वातुनी सुख मिळतेच मिळते ना उणे कोठे पडे जे हवे ते माझियावर बरसते जलदातुनी संकटे मज घाबरोनी पळुन जाती दूर रे जोडते नाते खरे मी धर्ममय वचनातुनी पाहते अन ऐकते मी साद माझ्या आतली कल्पनेतिल मस्त गोष्टी मिळविते गाण्यातुनी गझल गाणी आवडीची फँटसी स्वप्नातली माझिया…

  • मोसमी पाऊस – MOSAMEE PAOOS (monsoon rain)

    मोसमी पाऊस यावा चिंब भिजवित माझिया गावात गावा चिंब भिजवित भिजविले मज घन घनाने प्रेमरंगी तो स्वतःही त्यात न्हावा चिंब भिजवित गझल माझी धुंदलेली नाचणारी गातसे तिचियात रावा चिंब भिजवित वीज जेव्हा करितसे सारथ्य मेघी वाजवी पाऊस पावा चिंब भिजवित तू अता ये..तू अता ये… पावसारे “मी” अता करणार धावा चिंब भिजवित गझल अक्षरगणवृत्त (मात्रा…

  • अकारादीक्षरा – AKAARAADEEKSHARAA

    अरण्य भरले फळाफुलांनी वारा वाहे अः अः आठवणीतिल तळ्यात नावा तरंगणाऱ्या पहा पहा इमारतीतिल कैक सदनिका कैक उघडल्या रः रः ईश्वर केवलज्ञानी ब्रम्हा दिशादिशातुन दहा दहा उग्र तपाने प्राप्त मुनींना ऋद्धी सिद्धी मः मः ऊर्ध्वगति जीवास घेऊनी… चिंब पावसी नहा नहा ऋजुगति ऋजुमति सरळ सरल जे जाणायाला वः वः लृकार अक्षर सुवर्णकांती विघ्नविनाशक मः मः…

  • बोलावे – BOLAAVE

    अता खरे तू बोलावे पूर्ण पुरे तू बोलावे खोटे नाते नको जपू जसे झरे तू बोलावे फसवी आशा पुरी नसे जरा बरे तू बोलावे पाऊस येण्यासाठी ग हरित धरे तू बोलावे कशास चर्चा जगण्याच्या कोण मरे तू बोलावे सर्वांमध्ये ढोंग दिसे मीच उरे तू बोलावे कोठडीतुनी सुटावया खरेखुरे तू बोलावे नको लावु तू ओकाया पचे…

  • फुलवाली – FUL VAALEE (female florist)

    फुलवाली का मूक जाहली बुके बांधुनी झाडांवरचे गुलाब मौनी मुके बांधुनी दाट धुक्यातिल दिसतिल वाटा सूर्य उगवता कसे ठेवशिल निळे पारवे धुके बांधुनी पूल बांधण्या नदीवरी तू पसर ओंडके नकोस ठेवू ओले ते वा सुके बांधुनी नाजुक माझ्या हृदयामध्ये गझलेमध्ये खरेच का मी मुला फुलांना चुके बांधुनी अंबरातल्या अन भूवरल्या साऱ्या चंचल नक्षत्रांना मी तारा…

  • गोम्मट हाऊस – GOMMAT HOUSE

    गोम्मट व्हिल्यावर घन झुकला पाण्याने भरल्यावर झुकला रंग पारवा निळसर ज्याचा असा जिना वळणावर झुकला वेल कळ्यांनी लदबदली अन शुभ्र फुलांचा मांडव झुकला भित्तीचित्रे कलापूर्ण ही पहा त्यातला मानव झुकला जलाशयावर बरसायाला रंग भरूनी श्रावण झुकला गोम्मट हाऊस मधुन कटता व्यंतर कपटी ! नागर झुकला गोम्मट हाऊस मधले प्रेम पाहुन ओला मोसम झुकला जेते इथले…

  • ओढा – ODHAA (natural water stream)

    आयुष्य सुखाने जगतो आम्ही आयुष्य सुखाने भरतो आम्ही व्यापार सुखाचा करती कोणी आयुष्य सुखाचे करतोआम्ही चारित्र्य घडाया अपुले सुंदर आयुष्य सुखाचे स्मरतो आम्ही पाऊस पडाया निघतो जेव्हा आयुष्य सुखावर फुलतो आम्ही धारांत भिजाया येता ओढा आयुष्य सुखावर झुलतो आम्ही गझल मात्रावृत्त (मात्रा १८)