-
मंगल ललाट – MANGAL LALAAT
जलौघवेगा सुसाट सुंदर प्रवाह खळखळ विराट सुंदर धबाबणारा प्रपात दावी रुपास अपुल्या अचाट सुंदर वळून झाले उसवुन झाले पुन्हा विणूया चऱ्हाट सुंदर अगीनगाडी रुळावरोनी मजेत धावे तराट सुंदर मिरवित आहे हळद नि कुंकू सतेज मंगल ललाट सुंदर निशांत झाला खरा सुनेत्रा नवी गुलाबी पहाट सुंदर वृत्त – जलौघवेगा, मात्रा १६ लगावली – ल गा ल…
-
निळाई – NILAAEE
भरात आली गझल गुणाची सुखात भिजली विमल गुणाची दवात भिजवी फुलांस साऱ्या अशीच ती रे सजल गुणाची तुला न कळली तिला न कळली कमाल तिचिया अचल गुणाची मृणाल बनते मुलांस जपण्या खरीच सुंदर कमल गुणाची कितीक आले जरी मळविण्या कधीन मळते अमल गुणाची विरून जाई खिरून जाई मृदुल मनाची तरल गुणाची जशी निळाई तशी सुनेत्रा…
-
रुमाल – RUMAAL
लिहीन काही नवे नवे मी सुचेल जे जे मला हवे मी कलम असे गुज करे वहीशी पुन्हा पुन्हा तेच आळवे मी थकेल जेव्हा रुमाल माझा टिपून घेईन आसवे मी जरीन दांडू करात माझ्या चुकार विट्टीस टोलवे मी उडवित बसते निळ्या मनाचे प्रभात होता नभी थवे मी निळ्या समुद्रास गाज सांगे रड्या तरंगास हासवे मी निघेन…
-
नवी भरारी! NAVEE BHARAAREE!
नशीब म्हणजे नवी भरारी! स्वतःच घ्याया हवी भरारी!! प्रभात होता!! कुणी निशाचर! म्हणेल घेना रवी भरारी!! सुजाण या! मैफलीत माझ्या… असेल ही भैरवी भरारी!!!! पिसे गझलचे! नभी तरंगे!! तनू तिची!आळवी भरारी! हृदय असे हे!! बुलंद माझे!!! विधीलिखित- वाकवी भरारी!!! वृत्त – जलौघवेगा, मात्रा १६ लगावली – ल गा ल गा गा/ ल गा ल गा…
-
व्योमगंगा – VYOMA GANGAA
त्या तिथे कोणीच नव्हते पण तरी ती भीत होती आतला आवाज म्हणतो हीच मोठी जीत होती मृदु निरागस भाव नयनी उंबराचे फूल जणु ती पण तिला ठाऊक नव्हते ती स्वतः संगीत होती अंतरीचा नाद दिडदा ऐकता हरवून गेली हरवली पण गवसलेले शब्दधन सांडीत होती मेघमाला भासली ती वाटिका फुलवून गेली मेघमाला सावळी पण वाटिका रंगीत…
-
नक्षत्र बाला – NAKSHATRA BAALAA
तृप्त झाली ही धरा बघ चांदण्यांच्या पावसाने रातराणीच्या फुलांनी भरून गेली सौरभाने अंबरातिल मेघनेसह तारकांनी नृत्य केले दाविल्या त्यांच्या अदा अन बिंब सुंदर आरशाने मंदिरातील दीपज्योती धूप दरवळ कर्पुराचा अंगणी मृदगंध लहरे शिंपलेल्या पावसाने शुभ्र कलिका मोगऱ्याच्या वेल जाई उंच गगनी आसमंती सूर झरती पंडितांच्या गायनाने देखण्या नक्षत्र बाला मुग्धही आकाशगंगा मी सुनेत्रा शब्द वेचे…
-
शह -SHAH
वृत्त अपुले मंजुघोषा आज आहे वीस आणिक एक मात्रा साज आहे मी लिहावे तू लिहावे मस्त काही जाण मित्रा खास माझा बाज आहे बासरीचा सूर कृष्णा हा नसावा राधिकेच्या अंतरीची गाज आहे पाहिले स्वप्नात रात्री स्वप्न वेडे उंच माझ्या मस्तकी सरताज आहे कुंतलातिल शुभ्र गजरा मोगऱ्याचा मैफिलीच्या पापण्यांतिल लाज आहे राम नाही श्याम नाही धुंद…