Category: Ghazal

  • मंगल मंगळ – MANGAL MANGALH

    मंगल मंगळ नकोच कलकल चिखलच मलमल कमळे श्यामल वारा शीतल पांघर वाकळ उघडे कातळ पुष्पे कोमल मात्रावृत्त – ४ मात्रा

  • कुरुपतेचा अस्त – KURUPATECHAA AST

    सुस्त नाही मस्त आहे मी मराठी चुस्त आहे बहरले लावण्य माझे भोवताली गस्त आहे वाहनांचा वेग नडतो जीव येथे स्वस्त आहे श्वानही वेळेत येतो लावलेली शिस्त आहे संस्कृतीला जपत म्हणते हात नाही हस्त आहे खीर ना पात्रात उरली जाहली ती फस्त आहे सुंदरा हसते ‘सुनेत्रा’ कुरुपतेचा अस्त आहे वृत्त – गा ल गा गा, गा…

  • बावन गज – BAAVAN GAJ

    बावन गज मी टाकित गेले जमीन मोजाया सत्तावन फुट खोल उतरले विहीर खोदाया अक्षर अक्षर नीट पारखुन शब्द उभे केले शब्दांना मग वळव वळवले गझला बांधाया शुद्ध जलाने भिजवित गेले निळीभोर वसने चिंब भावना पुन्हा ठेवल्या उन्हात वाळाया चावुन चोथा करून विषया टोळ पुरे थकले निंदक आता बघा लागले मलाच टाळाया बरे जाहले सुटका झाली…

  • भाग्यवान – BHAAGYAVAAN

    किती दिसांनी फूल उमलते कलमी रोपावरी मृदुल पाकळ्या तेजस वर्णी चण ही नाजुक जरी कैक कुमारी कोरफडी या भवती तुझिया फुला बाजुस भक्कम आम्रतरू हा डुलतो भक्तापरी भूमीमध्ये गाडुन घेउन अंतर ध्यानामधे रमले आहे उत्सुक उत्सुक गोंडस माइणमरी चिमणपाखरे अंकुर दाणे टिपण्या यावी इथे भिजवाया तनु पंख तयांचे पडोत श्रावणसरी नाव ‘सुनेत्रा’ सार्थ जाहले तुमच्या…

  • जांभई – JAAMBHAEE

    जांभई येतसे झोपना बाळही झोपले झोपना हे धुणे साठले रोजचे फक्त मी धूतसे झोपना त्रासका हा तुझा आजही पाहुणे यायचे झोपना कोठली गोष्ट मी सांगुरे चांदणे लोपले झोपना गीत तू गा सखे गोडसे चंद्रिका सांगते झोपना वृत्त – गा ल गा, गा ल गा, गा ल गा.

  • अधीर मस्त नाचरा – ADHEER MAST NAACHARAA

    स्वरात कंप कापरा अधीर मस्त नाचरा मधाळ धुंद बावरा अधीर मस्त नाचरा कवाड बंद का असे उनाड वात तापण्या झरावयास मोगरा अधीर मस्त नाचरा लिहावयास लावणी भिजेल आज टाकही बनेल लाज-लाजरा अधीर मस्त नाचरा तुलाच चुंबिण्या प्रिये झुलेल श्रावणात तो उडे धरून कासरा अधीर मस्त नाचरा कपोत हूड गोल तो खुलेल पावसात या म्हणेल गाच…

  • डॉटर – DAUGHTER

    श्रावणाची डॉटर मी चक्रवाली पॉटर मी नीर आहे गडद निळे हॉट नाही हॉटर मी गाठ नाजुक मारतसे गुरव अस्सल नॉटर मी झेल घेण्या अवघड रे हात सुंदर कॉटर मी मोरपंखी बॉटलचे शुद्ध क्षारद वॉटर मी वृत्त -गा ल गा गा, गा ल ल गा