Category: Ghazal

  • मज मना – MAJ MANAA

    मज मना लाजणे आवडे पापण्या झुकविणे आवडे राग तो गिळुनिया अंतरी अधर तव दाबणे आवडे कावरी बावरी लोचने चोरुनी वाचणे आवडे हृदय तू बंद केले जरी त्यात मज राहणे आवडे मी समोरी असोनी तुझ्या आडुनी पाहणे आवडे टोमणे मारणे बासना मज मधुर बोलणे आवडे दे सुनेत्रा गझल नित नवी त्यात मज डुंबणे आवडे वृत्त –…

  • रे मना – RE MANAA

    आज तू बोलना रे मना मौन तू त्यागना रे मना सावल्या सोडुनी चालल्या भटकणे सोडना रे मना पांगली माणसे जवळची ती पुन्हा जोडना रे मना गोडवा चाखण्या प्रीतिचा विकृती जाळना रे मना रडविले तू मला कैकदा मजसवे हासना रे मना मैत्र हे अंतरी टिकविण्या मोकळे होचना रे मना गा पुन्हा गीत तू ते जुने भिजवुनी…

  • पद्मावति – PADMAAVATI

    नको लिहू तू, नको श्रमू तू, गझला कोणी, तुझ्या विके घडीभराचा, घेच विसावा, पुढे दाटले, गच्च धुके हळूहळू अरुणोदय होइल, शांत झोपल्या, धरेवरी दिशा स्वतःही, निघे पूजना, वस्त्र तिचे मृदु, धूत फिके स्वच्छ झाडल्या, पदपथावरी, प्राजक्ताचा, सडा पडे भल्या पहाटे, वेचत पुष्पे, कोणी बालक, गणित शिके पालखीत वनदेवी बसता, चवऱ्या ढाळी, रानजुई स्वागत करण्या, पद्मावतिचे,…

  • मयुरबाला – MAYUR-BAALAA

    निघे सासुराला जरी मेघमाला नको नीर सांडू म्हणे पावसाला न्यहाळू कशाला घनांची निळाई धरेवर निळी नाचता मयुरबाला सई ये प्रभाती फुले वेच सारी करू गूजगोष्टी बसोनी उन्हाला बरस पारिजाता नवी मांड चित्रे जसे चंद्र तारे घरा-अंगणाला झरा बागडे हा पुन्हा परसदारी मला सांगतो ये बसू वारियाला नभी पाखरांचे थवे गात झुलता मधुर गीत गाण्या गळा…

  • लंकेवरी – LANKEVAREE

    विजयपताका फडकत राहो तशीच लंकेवरी अता उभारू करकमलांची गुढीच लंकेवरी जिनानुयायी खराच रावण पुराण अमुचे म्हणे म्हणून राउळ मशीदसुद्धा नवीच लंकेवरी खुडेन दुर्वा भल्या पहाटे जुड्या फुले वाहण्या गणेश भक्ती तुझी दिसूदे अशीच लंकेवरी कलीयुगाची अखेर बघण्या सरळ रचूया जिना उभी करूया मुला-मुलींची फळीच लंकेवरी फितवुन कोणी म्हणेल जरका तिथे रहाती भुते करायचीना उगाच स्वारी…

  • माय मऱ्हाटी – MAAY MARHAATEE

    माय मऱ्हाटी जिनवाणीसम देवा आम्हाला इंग्लिश देते नात तिचीरे सेवा आम्हाला कन्नड हिंदी गुजराथीने मऱ्हाटीस जपले तमिळ तेलगू उर्दू भरवी मेवा आम्हाला बंगालीचा पावा मंजुळ कटुता तुळु विसरे मल्याळीही  संगे म्हणते जेवा आम्हाला प्रगती पाहुन गुणीजनांची मुनीवर आनंदी कधी न वाटो गुणीजनांचा हेवा आम्हाला रत्नत्रय हे हृदयी मिरवू खरी संपदाही पुण्यभूमिवर हाच मिळाला ठेवा आम्हाला…

  • भूमी ताई – BHUMEE TAAEE

    पृथ्वी धरती भूमी ताई करिते नावे धारण सुंदर क्षमाशीलता तिची प्रकृती मौन घनासम पावन सुंदर शुभ्र मोगरा पर्णदलातिल सुरभित कोमल तसे शब्द हे मार्दव असते या कुसुमांसम तसेच बोलू आपण सुंदर हृदयापासुन खरे बोलतो वचनांसम त्या कृतिही करतो तोच खरा रे गुरू दिगंबर त्याचे आर्जव पालन सुंदर शौच शुद्धता अंतःकरणी असते तेव्हा ते अतिमोहक अश्याच…