-
काटवट कणा – KAATVAT KANAA
काटवट कणा खेळत्यात सुना वाकुन वाकुन करे लेक खुणा आली आली सासू उड टणाटणा देगं दे लुगडं उघडुन खणा वटवट सई करतीया जना उडदार काळा नवाच बांधना जावाई म्हणतो गाणं म्हण घना नको नको बापू पवाडाच म्हणा ही नणंद मैना तिला तू वरना शिवारी जोंधळा डोलतोय फणा सुपातला दाणा जात्यात घालना म्हण म्हण ओवी खुंटा…
-
सोटा – SOTAA
जुळेल आता खरी कुंडली दोघांचीसुद्धा नसेल आता वक्र नजर ग्रह गोलांचीसुद्धा बडबड आता पूर्ण मिटावी सग्यासोयऱ्यांची सरेल अंतर जुळतिल नाती टोकांचीसुद्धा वाट पाहणे शिक्षा नव्हती आनंदे सरली गीते लिहुनी भोगांची अन योगांचीसुद्धा तत्त्व जाणता धर्म जाहला प्रेमाची भाषा तीच असावी देहाची अन आत्म्याचीसुद्धा करे लेखणी तुझी ‘सुनेत्रा’ प्रहार सोट्याचा घेच काळजी लेखणीतल्या सोट्याचीसुद्धा मात्रावृत्त –…
-
पुन्हा धबधबावे – PUNHAA DHAB DHABAAVE
अता मी लिहावे अता मी पुसावे फिरूनी कुरूपा अचुक मी टिपावे खऱ्या पावसाला असा जोर येता पुन्हा प्रेमस्मरणी मजेने रमावे धरा चिंब झाली झरा वाहतो हा तयातील पाणी मनी साठवावे निळे मेघ आता किती कृष्ण झाले तयांसारखे मी अता मुक्त व्हावे अशी ये समोरी मला सत्य म्हणते कधीची उभी मी तया ते कळावे नदी आटलेली…
-
सर्व कळव – SARV KALHAV
शब्द फिरव वही भरव पटापटा धुणे बडव काना दे नीट गिरव मात्रांना अचुक बसव जमीन कस पालं उठव खण खड्डा परत बुजव पुष्पांनी देह सजव कवितेने हृदय फुलव सुनेत्रास सर्व कळव मात्रावृत्त – ६मात्रा
-
मंगल मंगळ – MANGAL MANGALH
मंगल मंगळ नकोच कलकल चिखलच मलमल कमळे श्यामल वारा शीतल पांघर वाकळ उघडे कातळ पुष्पे कोमल मात्रावृत्त – ४ मात्रा
-
कुरुपतेचा अस्त – KURUPATECHAA AST
सुस्त नाही मस्त आहे मी मराठी चुस्त आहे बहरले लावण्य माझे भोवताली गस्त आहे वाहनांचा वेग नडतो जीव येथे स्वस्त आहे श्वानही वेळेत येतो लावलेली शिस्त आहे संस्कृतीला जपत म्हणते हात नाही हस्त आहे खीर ना पात्रात उरली जाहली ती फस्त आहे सुंदरा हसते ‘सुनेत्रा’ कुरुपतेचा अस्त आहे वृत्त – गा ल गा गा, गा…