-
सण मनभावन – SAN MANBHAAVAN
हिरव्या पानी फुलेल फुलवा सुगंध उधळित हसेल मरवा सतेज हळदी कुंकुमवर्णी प्रीत प्राशुनी भरेल गडवा मंदाग्नीवर मृदुल करांनी काटेरी घन खुलेल हलवा गोड हासऱ्या लेकींसाठी फांदीवरती झुलेल झुलवा अनुरागाचे गीत गुलाबी रागामध्ये सुरेल बसवा सत्त्यासाठी प्रेमासाठी सैनिक अमुचा लढेल कडवा वाण लुटाया संक्रांतीचे सण मनभावन असेल बरवा मात्रावृत्त (८+८=१६)
-
चित्र रेखाटिता – CHITR REKHAATITAA
चित्र रेखाटिता हरित पावलांनी नाव ही रेखिले मृदेच्या कणांनी उच्छवासापरी धुराडे चुलीचे ओकते काजळी भरोनी ढगांनी आरसा पाहुनी नटावे सजावे स्वप्न डोळ्यातले गुलाबी क्षणांनी गंध मातीतला मिळाला हवेला शिंपिता अंगणी सडा या घनांनी लागले भृंगहे इथे ते घुमाया काव्य शाकारता कळ्यांनी फुलांनी वृत्त – गा ल गा, गा ल गा, ल गा गा, ल गा…
-
तहान – TAHAAN
हवा पावसाळी उदास उदास तरी कुसुम उधळे सुवास सुवास जिथे रम्य संध्या पहाट दुपार निशा मस्त तेथे झकास झकास जसा धावणारा जळात तरंग तसा भावनेचा प्रवास प्रवास उडाया झुलाया खुले घरदार तिथे पाखरांचा निवास निवास म्हणे कोण तृष्णा तहान तयास किरण चुंबणाऱ्या दवास दवास लढे जो कराया स्वतःस स्वतंत्र करे कैद कैसा खगास खगास वृत्त…
-
भाग्यशाली फणी – BHAAGYASHAALEE FANEE
साद घाली कुणी सुनेत्रा सुनेत्रा नाव ध्यानी मनी सुनेत्रा सुनेत्रा आसवांनी खऱ्या फळावे गळावे भावना घुसळुनी सुनेत्रा सुनेत्रा प्रेम होते जरी कसे ना कळाले मिळव ते देउनी सुनेत्रा सुनेत्रा सर्व काही तुला मिळाले उशीरा पण तरी हो ऋणी सुनेत्रा सुनेत्रा पूर्व पुण्याइने मिळाली क्षमेची भाग्यशाली फणी सुनेत्रा सुनेत्रा मेघ गातीलही अता पावसाळी शब्द हे वर्षुनी …
-
वीसचौदा – VEES-CHOUDAA
आले नव्या क्षणांचे दमदार वीसचौदा ठोकेल पार क्षितिजी षटकार वीसचौदा गेले खिरून झरुनी बिंबात वीसतेरा गाठून मंगळाला येणार वीसचौदा हृदयास शुभ्रवर्णी छेडून तार जाता रंगात लक्ष सुंदर भिजणार वीसचौदा नाचे मयूर रानी फुलवून मोरपीसे त्यातील पीस आहे अलवार वीसचौदा काटे किती जुने ते असुदेत टोचणारे काढून त्यांस जखमा भरणार वीसचौदा फुलपाखरी मनाची स्वप्ने खरी कराया…
-
सरेल रात गात गात – SAREL RAAT GAAT GAAT
भिजेल चिंब चांदण्यात सरेल रात गात गात नवीन सूर्य उगवताच सरेल रात गात गात जुने नवे स्मरून प्रेम बुडेल हृदय पूर्ण त्यात खिरेल नीर लोचनात सरेल रात गात गात हसेल पूर्व अंबरात झरेल नाद मंदिरात झुलेल वात पाळण्यात सरेल रात गात गात खगास जाग येत येत घुमेल शीळ वाटिकेत सुगंध भोर सावल्यात सरेल रात गात…
-
आत्म परीक्षण करण्यासाठी – AATM PARIKSHAN KARANYAASAATHEE
आत्म परीक्षण करण्यासाठी दिवस आजचा पुरेलका आत्म परीक्षण करण्यासाठी नयनी पाणी भरेलका जगण्यासाठी हवेच मीपण मरण्यासाठी कर तू तू आत्म परीक्षण करण्यासाठी इतुके मीपण पुरेलका तर्क लावुनी मिळेल उत्तर असेल जर तो प्रश्न खरा आत्म परीक्षण करण्यासाठी प्रश्न उत्तरी झरेलका जिंकशील जर करुन परीक्षा दुसऱ्यांमधल्या न्यूनांची आत्मपरीक्षण करण्यासाठी आज अहंपण हरेलका अर्थ जाणण्या आत्मबलाचा नाम…