दे मला म्हणणार नाही – DE MALA MHANNAR NAHI (I DON’T SAY GIVE ME)


दे मला म्हणणार नाही
घे तुला म्हणणार नाही

गर्जणाऱ्या वारियाला
कोपला म्हणणार नाही

हुंदके जो गोठवी त्या
स्फुंदला म्हणणार नाही

जो रडी खेळे तयाला
खेळला म्हणणार नाही

डोलणाऱ्या लंबकाला
मी झुला म्हणणार नाही

लाट नाही ज्यात त्याला
गाजला म्हणणार नाही

जो न वेडा जाहला त्या
रंगला म्हणणार नाही

वृत्त – गा ल गा गा, गा ल गा गा.


One response to “दे मला म्हणणार नाही – DE MALA MHANNAR NAHI (I DON’T SAY GIVE ME)”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.