Category: Ghazal

  • शुभ्र झरा – SHUBHRA ZARAA (pure spring)

    शुभ्र झरा खळखळतो आहे तुषार अगणित दळतो आहे पूर्ण जरी ना कळला मजला थोडा थोडा कळतो आहे वेलींवरच्या कळ्या बघाया मागे मागे वळतो आहे जे झाले ते बरे तरीही उगाच तो हळहळतो आहे पदर उडविण्या मुग्ध प्रियेचा पवन किती सळसळतो आहे

  • स्वप्न देखणे – SWAPN DEKHANE (handsome dream)

    सौधावरती उभे राहुनी पहात राहू स्वप्न  देखणे झाडावरती महाल अपुला निवांत गाऊ गीत साजणे हवेत उडते विमान सुंदर खरी कराया सजग कहाणी हात असूदे हातामध्ये नको गोठणे नको तापणे

  • स्वप्न नवे – SWAPN NAVE (new dream)

    तुज पाहते तुज ऐकते मज एवढेच कळे प्रिया मनी मानसी खग गातसे उबदार कंठ वळे प्रिया पडताच स्वप्न नवे निळे दव प्राशुनी खिरते निशा हसऱ्या उषेस पहावया नयनात डोह तळे प्रिया घन सावळा गगनी फिरे चमके नभी बिजली जरी हृदयात प्रीत जपावया भय सोड तू सगळे प्रिया उचलायचा न मला अता नच रिक्त वा भरला…

  • शिशिर वारे चालले – SHISHIR VAARE CHAALALE (winter wind is blowing)

    बावऱ्या गझलेस माझ्या स्थैर्य आता लाभले शेर सारे प्रकटलेले अंतरातुन उजळले कलम हाती घेउनी मी फोडता या हिमनगा शुभ्र मौक्तिक चूर्ण माझ्या भोवताली सांडले ना सिकंदर व्हायचे मज ना गुरूही व्हायचे जिंकण्या हृदये फुलांची मी बहर हे माळले गोठल्या झाडात पुन्हा आवाज काही गुंजता मृदुल हिरव्या पालवीने अंग त्याचे रंगले शब्द मोहक अर्थ सुंदर वृत्त…

  • ऐनक – AINAK (eye wear)

    उंचावुन तव रेखिव भृकुटी शरसंधाने मरतो मी मिटल्या नेत्रा चुंबिताच तू जिवंत होउन उठतो मी सजणे धजणे पिंड न माझा असा न भावे स्वतःस मी ऐन्यावरची धूळ झटकता मम रूपावर भुलतो मी सतेज कांती ताठ नासिका ऐनक नीतळ नजरेचा हनूवटीवर खळी पाडुनी किती लाघवी हसतो मी कर्तव्याचे मला न ओझे तो तर माझा धर्म खरा…

  • घड्याळ माझे – GHADYAAL MAZE (my wall clock)

    लंबक हलतो काटे फिरती करते टिकटिक घड्याळ माझे सुसम तबकडी आकडे बारा चाले झुकझुक घड्याळ माझे जोवर घेते श्वास तोवरी अखंड फिरती हात तीनही सेल संपता श्वास अडकतो करते चुकचुक घड्याळ माझे धूळ झटकण्या अंतरातली भिंतीवरुनी उतरे खाली वळवुन काटे सेल घालता गाते धकधक घड्याळ माझे जुनी ब्याटरी  बुरसटल्यावर कधी कधी चाले किल्लीवर मूढ अडमुठ्या…

  • वसंत गीत – VASANT GEET (happy season’s song)

    माघ फाल्गुनी वसंत वारे कृष्ण अंबरी अनंत तारे आम्रतरू गुलमोहर फुलतो बहर जोवरी तोवर झुलतो पक्षी उडती दिगंत सारे चैत्र उन्हाची रंग पंचमी गाते सरिता दंग संगमी गीत तिला जे पसंत गारे ग्रीष्म काहिली येथे तगमग सहा ऋतुंची जेथे लगबग घेण्या अंमळ उसंत यारे मात्रावृत्त (८+८=१६मात्रा)