Category: Ghazal

  • हात सुंदर – HAAT SUNDAR (loving hands)

    घडविती सौंदर्य सारे हात सुंदर लाभली धरणीस त्यांची साथ सुंदर अंगुली रंगात भिजुनी कृष्ण होता भावली गगनास त्यांची जात सुंदर माळुनी हृदये फुलांची स्वप्नवेडी धावतो रानात वेडा वात सुंदर या भुजांनी खोदल्या विहिरी मनातिल उसळते त्यातून पाणी गात सुंदर अंतरातिल वादळाला तोंड देण्या तळपते ही लेखणीची पात सुंदर वृत्त – गा ल गा गा, गा…

  • चपला – CHAPALAA (lightning)

    व्यर्थ कुठे हळहळली नाही अधेमधे ती वळली नाही सुबोध भाषा या गझलेची पण मूढांना कळली नाही नागीणीसम असून चपला भिववाया सळसळली नाही जरी पेटली जरी भडकली कुणावरीही जळली नाही तेल तापता फुलून आली अर्धी कच्ची तळली नाही वादळ गारांच्या माऱ्याने फांदीवरुनी गळली नाही परिघामधुनी सहजच सुटली इथे तिथे ओघळली नाही मात्रावृत्त (८+८=१६मात्रा)

  • मोक्षानंद – MOKSHAANAND (spiritual joy)

    त्रास सरावा श्वास मिटावा श्वास मोकळा शुभ्र हसावा शुभ्र मनाचा रंग खुलावा रंग प्राशुनी सुगंध यावा सुगंध भरला देह फळावा देहामध्ये प्राण असावा प्राणीमात्रा मोक्ष मिळावा

  • सम्यक मोळी – SAMYAK MOLEE( complete bundle)

    तीनच ओळी सतरा अक्षरांची सम्यक मोळी बांधूया झोळी लाटुया जाळीदार पुरणपोळी मूर्ती प्रक्षाळू दशलक्षण धर्म गुणांचा पाळू

  • पान का काळे करू – PAAN KAA KAALE KAROO (why blacken the page)

    सांग मी मम पुस्तकाचे पान का काळे करू काजळीने लोचनातिल भाव का काळे करू शान माझ्या चेहऱ्याची रुंद मोठे उंच जे फक्त मजला शोभते ते नाक का काळे करू धन्य झाले तृप्त झाले संत वचने ऐकुनी झळकती ऐन्यापरी ते कान का काळे करू मी न कुठले कार्य करते मी स्वतःला तोलते तोलताना बोलताना ओठ का…

  • सारथी – SAARATHEE (charioteer)

    वादळे रोंरावताना मेघ गगनी ठाकती शेर ओढी रथ ढगांचा ‘मी’ तयांचा सारथी खेचुनी मम भाव सारे शून्य मी भासे कधी छळत राही पण अनामिक सांजवेळी ओढ ती पौर्णिमेचा चंद्र उगवे अंतरी माझ्या कधी द्यावया आतूर हाका घन समुद्री गाज ती वादळे बनतात जेंव्हा भावनांची गलबते मीच प्रज्ञा मीच प्रतिभा मी सुमेधा अन रथी बीज असुदे…

  • खरे काय आहे – KHARE KAAY AAHE (what is true)

    खरे काय आहे बरे काय आहे कळावे तुला रे बरे काय आहे तुला पाहिले मी तुला ऐकले मी तरी जाणले ना भले काय आहे गुपिते मनाची जुनी रेखताना जरा अनुभवावे नवे काय आहे नसे तू नसे मी नियंता इथे रे घ्यावा कुठे काय आहे कसा शोध किती मोह तुजला उणे शोधण्याचा अता अधिक शोधू खुले…