Category: Ghazal

  • AGAIN

    Again and again Brain should gain It’s the “MAGIC” Purity stands gain GAIN…  RAIN ………….MAIN ….

  • डंका – DANKAA(BIG DRUM)

    चंपक चाफा हिरवा पिवळा दरवळ नाही लपत गडे चंचल चपला ढगात शिरुनी कुपीस फोडे छपत गडे डंका दंडकारण्याचा त्रिलोकात दुमदुमे सई गज़ल सयी मम उभ्या ठाकल्या थेट बघत वर तपत गडे चपळ चपल हरिणीसम धावत जलद निघाले वर्षाया निळ्या सपाता गळून पडल्या पावलांस घन जपत गडे वेग झपाटा झपाटलेला लगबग घाई सळसळती ऊन सावली संगे…

  • कारवा – CARAVAN

    दोन प्रहरी घे विसावा मारवा टाळू गडे कोळशाच्या शेगडीवर सार वाफाळू गडे ऊन आले बागडाया परसदारी अंगणी थांबल्या पाऊस धारा गारवा गाळू गडे घार भांडिक मोर शामा अन गवय्या गावया पाखरांना घाल दाणे पारवा पाळू गडे जाहली मळणी उफफणी ये भरू पोती नवी बोर पपई ऊस चोरा खा रवा चाळू गडे वाळवंटी कारखाना चालवाया रेतिचा…

  • भावंडे – BHAVANDE(SIBLINGS)

    आरतीला सूर्य तारे चंद्र नक्षत्रे उभी अंतरी जिन स्थापिला मी जैन भावंडे उभी सागरी दुर्गावरी ध्वज पंचरंगी फडफडे रंग देखाव्यात भरण्या मृत्तिका चित्रे उभी पंचगंगा वारणा कृष्णा कऱ्हा गोदावरी काफिया स्वर गझल नैया फेकुनी जाळे उभी अंतराळातील व्यंतर देव आले दर्शना मार्ग त्यांचा शुद्ध करण्या हळदुली पत्रे उभी ओतता तबकात राशी शुद्ध भावे ओंजळी उघडली…

  • स्मार्ट – SMART

    लीड माझे लेखणीने जीव रक्षे लेखणीने सत्य धर्मा जागताना जलद खोडे लेखणीने संगणक हा स्मार्ट साधू शीड हलवे लेखणीने मज उणे नाही कुठेही पात्र भरते लेखणीने टोक गाठाया सुनेत्रा खुंट रोवे लेखणीने

  • संयम -SANYAM(PATIENCE)

    क्षमा मार्दवाचा मणी रत्नत्रय हृदय आर्जवी लावणी रत्नत्रय शुचित्त्वात सत्याग्रही संयम धर तपे त्याग मूर्ती गणी रत्नत्रय लगागा लगागा लगागा लललल अकिंचन्य धर्मी फणी रत्नत्रय कळस मंदिराचा दहा ब्रह्मचर्य करे भादवा पेरणी रत्नत्रय जिनालय सुनेत्रा स्मरुन हात जोड जिनांच्या कपाटी खणी रत्नत्रय

  • ढाल – DHAAL(SHIELD)

    अस्तित्त्वावर श्रद्धा ठाम निश्चय व्यवहाराचा साम मम तत्त्वांची हृदयी ढाल जीव लेखणी करते काम स्वाध्यायाचा मज आधार अंतर्यामी आत्माराम गृहस्थाश्रमी संसारात कर दोन्ही प्रिय उजवा वाम नऊ रसांचा घेउन स्वाद शांत रसाचा सांडे जाम जिनबिंबाची सुंदरता सत्य शिवाचे मंदिर धाम गुणानुरागी जिनधर्मात लीन सुनेत्रा पूर्ण विराम