-
उपचार – UPCHAR
कीड नडली पुन्हा बहर नडले कुठे पूर्ण उमलूनही पुष्प खुडले कुठे लाल अंगांग झाले रगडले कुठे चोर रंगेल हाती पकडले कुठे हा उन्हाळा नव्हे पावसाळा नव्हे नीर सांडे तरी भाव रडले कुठे मत्स्य भरतीतले रास जाळ्यामधे तप्त वाळूत मीन तडफडले कुठे कर्म प्राचीन जर धर्म संयम हवा कैक उपचार पण रोग झडले कुठे वीज नाचूनही…
-
राजधानी – RAJDHANI
पंकात वासनेच्या रुतले कधीच नाही कमळातले अली पण डसले कधीच नाही चढवून चिलखताला चिखलात खोल गेले तेथे निवास करणे रुचले कधीच नाही रंगून राजधानी सुकुमार भावनांची व्यापार त्यात करुनी फसले कधीच नाही घोटून अक्षरांना केली अशी करामत ठिणग्या करात फुलल्या विझले कधीच नाही तपवून पाप गेले देऊन पुण्य आले भिजले कृतज्ञ भावे रुसले कधीच नाही…
-
चुळबूळ – CHULBOOL
अमूल मूळ कुठले कूळ नवीन नाव भंजन खूळ खा पोळीस मोडुन सूळ बसले शांत चारुन धूळ जल पान करु भरून चूळ वय जाहले का चुळबूळ मी सुनेत्रा मोडे शूळ
-
सुकण्ण – SUKANN
कंठ शंख आवाज पुणेरी नखऱ्याचा नव बाज पुणेरी झणक फणक मिरचीचा ठसका ऐक समुद्री गाज पुणेरी ढोल नगारे लखलाभ तुला वाजविते पखवाज पुणेरी गालांवर रक्तिमा स्वरांकित नयनांनमधली लाज पुणेरी सुकण्ण सळसळते दो बाहू सुनेत्रास सरताज पुणेरी
-
पत्री – PATREE
अक्षर मोती शिम्पल्यातले अक्षर पत्री टपटप झरले जीवांमधले भाव रुजाया पत्रावरती जलद बरसले कितीक पत्रे किती छप्परे दारे भिंती फळे जाहले वनी अंगणी कैक काफिये रदीफ इंजिन त्यास जोडले अलामतीला जपेन म्हणता चिद्घन चपलेचे कर जुळले
-
बकरी – BAKRI
बकरी म्हण वा तिला भाकरी पसंत खाण्या मला भाकरी बाकुर सारण काहीही भर उचल करंजी कला भाकरी लळा लागल्यावरती बकरी खाऊ म्हणते चला भाकरी देय बाहुली थापुन भाकर भाजतोय बाहुला भाकरी तांदुळ ज्वारी रागीचीही करून देते तुला भाकरी क्षुधा शमविते लोरी गाते दोन तागडी झुला भाकरी उदरभरण अबलांचे करण्या देह तपविते बला भाकरी
-
मराठी गझल क्षेत्रात कविवर्य इलाही जमादार यांचे योगदान – YOG DAAN
मराठी गझल क्षेत्रात कविवर्य इलाही जमादार यांचे योगदान… ‘ जखमा अशा सुगंधी झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने तो मोगरा असावा’ ‘जखमा अशा सुगंधी’ या गझलकार श्री, इलाही जमादार या पहिल्याच गझल संग्रहातल्या एका गझलेतील हा शेर. जखमा अशा सुगंधीनंतर इलाहींचे एकूण चार ग़ज़ल संग्रह अणि मुक्तक व् रुबायांचा एक संग्रह प्रकाशित झाला. मराठी गझल जगतात…