Category: Ghazal

  • सांजरंग – SAANJ-RANG (COLORS OF THE EVENING)

    This Ghazal is written in twelve(12) matras. रंग रूप आस दाम देह करी फक्त काम उन्हामधे तापताच अग्नितून गळे घाम कृष्ण जरी कान पिळी जिभेवरी खुले साम यज्ञयाग घरी करा अंतरात जपा राम कलावंत जिंकताच उंच उंच हात वाम ठाक ठोक हृदयाची चौकटीत धूम धाम प्रेम अता फुलेलहो रहा फक्त तुम्ही ठाम माय माझी रेखिते…

  • सुंदरी – SUNDAREE (A BEAUTIFUL WOMAN)

    In this muktak the poetess says, ‘A beautiful woman knows her own beauty. She doesn’t need any mirror to know the power of her beauty.’ मी कशाला पाणियात पाहू गं चोरुनीया आरशास फोडू गं सुंदरी ही जाणते गं आत्म्यास देह चारू डौलदार तारू गं

  • खुळा शोक – KHULAA SHOK (CRAZY WEEP)

    खुळा शोक धो धो रडू लागला तळीचा फुपाटा उडू लागला बघा झेप घेती नभी पाखरे कुणी उंबऱ्याशी अडू लागला कशाने फुलावा अहंकार हा उन्हाने फुलोरा झडू लागला जरी एक आंबा असे नासका फळांचा ढिगारा सडू लागला किनाऱ्यास होडी तिथे लागता पुराने किनारा बुडू लागला जरी सत्य आहे तुझे बोलणे तरी डोस त्यांना कडू लागला निघाल्या…

  • मौन सोड तू – MOUN SOD TOO (BREAK YOUR SILENCE)

    मौन सोड तू, फक्त एकदा; करावया मज, रिक्त एकदा. होउन पुन्हा, तप्त एकदा; जिंक मुला तू, तख्त एकदा सैर कराया आभाळाची; व्हावे म्हणते, गुप्त एकदा. लढावयाची, ना भीती मज; पुन्हा सांडते, रक्त एकदा. नेत्रांमधुनी, हृदयी ये तू; होइन पुन्हा, भक्त एकदा.  

  • नवी शिकार – NAVEE SHIKAAR (NEW TARGET)

    In this Ghazal the poetess says, If you become open minded you will be able to solve biggest problems in your life. उघड झरोके, कवाड दार! सहज सागरा, करशिल पार! दो नयनांची, पाहुन धार! हृदय जाहले, पुरते  गार! क्षणाक्षणाला, नवी शिकार! तीर म्हणूकी, तुज तलवार! का थरथरतो, माझा श्वास? गझल असावी, त्यावर स्वार! येशिल का…

  • झरोके – ZAROKE (SMALL WINDOWS)

    Zaroke(झरोके) means small windows. उघडून दाव त्यांना गीतातले झरोके झाकू नकोस आता हृदयातले झरोके तोडेन तारकांना दिवसा उजेड असता उल्केस दावण्या मी गगनातले झरोके या माणसातसुद्धा असती लबाड कोल्हे शोधा तुम्ही तयांच्या डोळ्यातले झरोके अलवार गझल माझी हलकेच कंप पावे श्वासातुनी खुलावे शब्दातले झरोके पाण्यात पेटलेले प्रतिबिंब हासणारे तव लोचने ‘सुनेत्रा’ बिंबातले झरोके वृत्त- गा…

  • काय लिहू मी – KAAY LIHOO MEE (WHAT WILL I WRITE)

    सांग मायना काय लिहू मी पुत्र लेक की माय लिहू मी कुंडी मधल्या वटवृक्षावर विशाल की बोन्साय लिहू मी मैत्र जिवांचे व्यक्त कराया नमस्कार की हाय लिहू मी गझलेच्या भाळावर शीर्षक क्षीर लिहू की साय लिहू मी प्रीत कळीला शब्द समर्पक मुग्ध खरा की शाय लिहू मी तलफ यावया गझलेसाठी चहा पिऊकी चाय लिहू मी…