-
तिडी – TIDEE
पावलात दो तिडी असूदे वा दुर्वांची जुडी असूदे हळद उतरण्या अंध रुढींची दोन नयांची शिडी असूदे मुक्तक झाले पूर्ण तरी पण तिसऱ्या शेरी उडी असूदे शरी कुडीतच जीव जरी रे ऊर्ध्व गतीची छडी असूदे रत्नत्रय अंतरी सुनेत्रा सिद्ध गझल पोतडी असूदे
-
तुंबळ- TUMBAL
मंगल मंगळ मंगळवार मंदिर आगम कंदिल वार चंचल उपवन जंगल रान मंथर अंगण अंचल वार कुंदन कंकण किणकिण नाद मंद पवन घन मंजुळ वार झुंबर अंबर लखलख वीज मंचक झुलता कुंडल वार पावन बेला गोरज सांज मंत्र णमो जिन मंगल वार वृत्ती वृत्तातील प्रकार मंदाक्रांता तुंबळ वार शुक्र उगवला वारी आज मंडप मांडव मंडळ वार
-
काय – KAAY
काय लिहू मी काय लिहू काय कोण का प्रश्न लिहू प्रश्न नको तर उत्तर घे काय पुढे दो टिम्ब लिहू विरामचिन्हे टपटपती काय देह तनु चिंब लिहू खरा देव मम आत्मगुरुच काय कशाला मीच लिहू शेर खरे की वाघ बरे काय सुनेत्रा नाव लिहू
-
बीजमंत्र – BEEJ MANTRA
आत आत अंतरात बीजमंत्र घुमतात आत हृदय सप्तकात बीजमंत्र घुमतात गा ल गा ल गा व ली य इंग्रजीत ललबाय आत गर्भ गीत गात बीजमंत्र घुमतात सागरात गाजणार लहर लाट खिरणार आत खिरत एकजात बीजमंत्र घुमतात गोल घुमट आस सरळ वर्तमान भुतकाळ आत हात कंकणात बीजमंत्र घुमतात नाम गजर झांज टाळ अक्षरून फुलबाग आत वळुन…
-
सोम – SOM
सोम सुंदर वार आहे सोम शंकर वार आहे कोण म्हणते सोम मदिरा सोम संगर वार आहे गालगागा दोन वेळा सोम मंतर वार आहे चंद्रमा अन सिद्ध शीला सोम अंबर वार आहे वार मोजाया खड्यांनी सोम कंकर वार आहे अंधश्रद्धा सोड मनुजा सोम अंतर वार आहे मी सुनेत्रा जाणते हे सोम मंदिर वार आहे
-
अंचल – ANCHAL
मंगल मंगल मंगळवार मंगल चंचल मंगळवार अंबर अंतर लालेलाल मंगल दंगल मंगळवार सुंदर नीरज तालेवार मंगल जंगल मंगळवार अंगण कुंतल गारेगार मंगल अंचल मंगळवार पीठ सुनेत्रा दाणेदार मंगल संबल मंगळवार
-
भूल – BHUL
मन कधी पारवा रे कळ गूढ गार वारे घन भूल भुलाबाई मन राग मारवा रे वन गर्द सावलीचे मन नवा कारवा रे तन बर्फ गोठलेले मन तसे ठार वारे हातभर भुई माझी मन म्हणे सारवा रे