-
सातबाराचा उतारा – SAAT BAARAACHA UTAARAA
पाच बारालाच लिहिला सातबाराचा उतारा माझिया हाती धरेचा सातबाराचा उतारा मी जरी शाईत काळ्या बुडवुनी टाकास लिहिते सप्तरंगी रंगला हा सातबाराचा उतारा काल होते चार बारा आज आहे पाच बारा बघ सहा बारा उद्याला सातबाराचा उतारा पुण्य मातीचे फळोनी मोतियासम अक्षरांचा मज मिळाला हा चिठोरा सातबाराचा उतारा टोलवीले कैक वेळा आज पण ते शक्य नाही…
-
स्प्लेंडर – SPLENDAR
झिंग झिंगल्यावरती थिरकत फुगडी सुंदर एक सांडली सोलापूरी बुगडी सुंदर पवन मावळी उद्यम नगरी गाव भोसरी पिंपवडातिल प्राधिकरण अन निगडी सुंदर फेटे टोप्या हेल्मेटच्या गर्दीमध्ये उठून दिसते मस्त पुणेरी पगडी सुंदर शाहूनगरी भटकायाला भारी वाहन जुनी तरीही स्प्लेंडर आहे तगडी सुंदर लेकीबाळी नटून बारामतीत फिरती विकावयाला सुबक बोळकी सुगडी सुंदर मम् गझलेच्या जमिनीवरती पाय रोवुनी…
-
रंग ढंग – RANG DHANG
विमान हे खरेच दिव्य तू बसून त्यात ये ललाल लाल लाल लाल लाल लाल गात ये तुझाच देश धर्म वाट पाहतो तुझी इथे निवांत छान मास मार्गशीर्ष कार्तिकात ये तुझ्यावरी रचावयास प्रेमगीत ते उभे लपेट शाल दोरवा पहाट गारव्यात ये स्वरात सात चांदण्यात रंगवून सत्य तू मजेत वाजवीत शीळ कौतुकात न्हात ये उनाड ऊन कोवळे…
-
लिखना मना नहीं है (ग़ज़ल) – LIKHANAA MANAA NAHEE HAI
कागज ख़राब है तो भी लिखना मना नहीं है मैली किताब है तो भी लिखना मना नहीं है लिखनेसे दिल भरेगा सदियोंसे लिख रहीं हूँ मुरझा गुलाब है तो भी लिखना मना नहीं है साकी खड़ी है कबसे हाथोमे जाम लेकर स्याही शराब है तो भी लिखना मना नहीं है हम है दिवाने आपके क्या…
-
ओखी -OKHEE
ज्या गुलाबी वादळाचे नाव ओखी त्या नबाबी वादळाचे नाव ओखी प्रश्न झेलत उत्तरांसव गरजणाऱ्या धबधबाबी वादळाचे नाव ओखी चिंब साकीला कराया धडकते जे त्या शराबी वादळाचे नाव ओखी घुसळुनी मृदगंध हृदयी झिंगणाऱ्या मम् शबाबी वादळाचे नाव ओखी सागरी लाटांपुढे जे ना झुके रे त्या रुबाबी वादळाचे नाव ओखी गझल अक्षरगण वृत्त गालगागा/४ वेळा
-
ग़ज़ल(बात मनकी) – GHAZAL (BAAT MANKEE )
हम खिले तो फूल भी खिलने लगे है डालपर पंछी खुशीसे गा रहे है रंग पत्तोंके हरे मन साँवलेसे बरसते है झूमके जल से भरे है आसमांसे क्यूँ कहू मै बात मनकी आसमांके कान सावनके झुले है मै करुँगी बात मेरी आतमासे आतमासे कर्म मेरे जुड़ गए है सुन सुनेत्रा लिख सुनेत्रा बोल ना मत…
-
रोज लिहावे (तीन मुक्तके) – ROJ LIHAVE
प्रभातीस मी लिहिते काही प्रभातीस आठवते काही किलबिल ऐकत पक्ष्यांची मज प्रभातीस जागवते काही …. लिहिण्यासाठी सहज सुचावे स्वप्न मराठी तुझे तुझे हसावे व्यक्त कराया भाव मोकळे भाषेचे ना बंधन व्हावे …. रोज लिहावे असेच काही अक्षरांतुनी हसेल काही लिहिता लिहिता झरती डोळे देणे त्यातुन जमेल काही ….