-
गुल्लिका – GULLIKAA
विंध्यगिरीवर श्यामल सुंदर जलद दाटले पुन्हा गोमटेश बाहुबलीवर जल मुक्त सांडले पुन्हा हाती चंबू सान दुधाचा टोकावर गुल्लिका धार ओतता धवल दुग्धमय घन कोसळले पुन्हा नीर क्षीर चंदन अन केशर अष्टगंध औषधी प्रपात धो धो सुवर्ण हळदी लोट उसळले पुन्हा पारिजात मोगरा चमेली चंपक जाई जुई सुरभित पुष्पांनी भरलेले मेघ बरसले पुन्हा अखंड रज्जूवर प्रेमाच्या…
-
अभ्यंतर – ABHYANTAR
-
प्रवासी पक्षी – PRAVAASEE PAKSHEE
-
खाडाखोडी – KHAADAA KHODEE
ठेव जपूनी मधुघट भरलेले तव अधरी अधरामधल्या बोलांनी भर हृदय घागरी मौनामधल्या भावभावना उसळुन येता अलबत येते गाजत भरती शुद्ध अंतरी गलबत येता मालाने गजबजते बंदर निवडक मालालाच त्यातल्या ठेव आगरी हस्तलिखीते मुद्रण प्रती भर मोजुनीया खतावणीतिल हिशेब दिसण्या खुल्या अंबरी खाडाखोडीवरती सुद्धा लिही खरे रे वळिवाची सर भिजविल पाने तुझी वासरी मात्रावृत्त (२४ मात्रा)
-
उदकाडी – UD KAADEE
-
सम्यक श्रद्धा -SAMYAK SHRADDHA
सम्यक श्रद्धेवर मी जगते सृष्टी माझी जिवंत आहे जगावयाची जगवायाची माझी भाषा ज्वलंत आहे म्हणोत कोणी काही मजला लिहीत राहिन सुरेल गाणी गाण्यांमधल्या बकुळ फुलांचा परिमल कीर्ती दिगंत आहे उंच कड्याच्या टोकावरुनी निळ्या नभाला बांधिन झूला सभोवताली पहावयाला मला कुठे रे उसंत आहे दोन पावलांपुरती भूमी बघून रोवे पाय अता मी पंख पसरुनी झेप घ्यावया…
-
गोरज -GORAJ
कलंक नाही डाग न कसला हे तर हळदी कुंकू घन वर अभ्रांच्या गर्दीत अंबरी खग ताऱ्यांचे नाजुक झुंबर गुरे वासरे वाटेवरती गळ्यात मंजुळ घंटा किणकिण सांजेच्या केशरी करातिल झळाळणारे कंकण बिलवर पुष्पपऱ्यांचे रूप घेउनी सारवलेल्या अंगणातुनी निळ्या जांभळ्या बाळ पाहुण्या भूचंपा डोलती भुईवर हवेत गोरज लाल सावळा वडावरी पक्ष्यांचा कलरव शेणसड्यावर रांगोळीतुन गुलबक्षीची फुले तरूवर…