-
गझनीत – GAZNEET (POEM WHICH IS GHAZAL AND SONNET TOO)
सुरभीतराई हळद माखुनी कनकलता भासे गिरवून मात्रा जलद सावळ्या सलिलसुता भासे अडवून वाऱ्या गडद रांगड्या सळसळता पर्णे समशेरधारी रजत दामिनी रण दुहिता भासे कदली दलांच्या हरित मांडवी अनवट कोड्यांनी लय सूर ताली भरुन सांडण्या घट हलता भासे वसने दिशांची घन निळे धुके मलमल बाष्पाची विखरून देता किरण तांबडा कलश रिता भासे पिवळ्या जमीनी कुरण जांभळे…
-
झबक – ZABAK (RACEME)
-
अक्षर मोती – AKSHAR MOTEE (PEARLS OF LETTERS)
नकोच काही देणेघेणे लिहावी छान मी गझल फुलपाखरासम उडायाला विणावी छान मी गझल उडून उडून दमल्यावरती चित्रात रेखण्या तिला चिमटीत सान पकडुन पंख धरावी छान मी गझल अंगणातल्या दोरीवरती वाऱ्यात सुकवायाला बुडवून वाहत्या निर्झरात पिळावी छान मी गझल भूचक्रासम गरगर फिरण्या तेलात सोडून उष्ण तांबूस लाल खुलाया रंग तळावी छान मी गझल झुळझुळ पहाट वाऱ्यासंगे…
-
नेत्रदान – NETRDAN (EYE DONATION)
केव्हातरी मिटाया मज लागणार डोळे ढाळू नकोस अश्रू मम तेवणार डोळे पत्रे उडून जातिल कर अंगणात गोळा पत्रांवरी पहाटे दव ओतणार डोळे माती तरूतळीची बकुळीस गोष्ट सांगे माझे तुझे मिळूनी होतील चार डोळे नेत्रांस दान करुनी दृष्टी दिली कुणाला ठाऊक ना जरी हे जग पाहणार डोळे तू नेत्रदान केले मी देहदान करते मौनात माय म्हणता…
-
सीमोल्लंघन SEEMOLLANGHAN (CROSSING THE BORDER)
सीमेचे उल्लंघन केल्यानंतर बोलू पुन्हा वेगळे आल्यावर प्रत्यंतर बोलू भटकुन भटकुन मन थकल्यावर ध्यानाग्नीतुन हरेक ओठांवर हलतो तो मंतर बोलू आंतरजाली फिरती शोधक नित्य इंजिने गूगलवरच्या इंजिनांस त्या व्यंतर बोलू देव पाहण्या नकाच काटू अंतर बिंतर नीतळ आत्म्यालाच स्वतःच्या अंतर बोलू विचार मंथन करण्याचा अन बोलायाचा मला सुनेत्रा आहे ध्यास निरंतर बोलू
-
पंचारती – PANCHARATI (PRAYING WITH FIVE LAMPS)
विंध्यगिरीवर श्यामल सुंदर जलद दाटले पुन्हा गोमटेश बाहुबलीवर जल मुक्त सांडले पुन्हा हाती चंबू सान दुधाचा टोकावर गुल्लिका धार ओतता धवल दुग्धमय घन कोसळले पुन्हा नीर क्षीर चंदन अन केशर अष्टगंध औषधी प्रपात धो धो सुवर्ण हळदी लोट उसळले पुन्हा पारिजात मोगरा चमेली चंपक जाई जुई सुरभित पुष्पांनी भरलेले मेघ बरसले पुन्हा अखंड रज्जूवर प्रेमाच्या…