-
ईद – EID
चंद्र पाहिला अंबरात अन हृदयात उमटली ईद निळ्या समुद्री उधाणले जल हृदयात उमटली ईद गुलाब काही मनातले मी वहीत ठेवून जपले वही उघडता आज अचानक हृदयात उमटली ईद जुनी डायरी त्यातिल नावे कुठे हरवली आहेत पुस्तकात ती बसता शोधत हृदयात उमटली ईद चंद्रकोर नाजुक झुलणारी नाविक मी जणु नावेत भवती मासे फिरता सळसळ हृदयात उमटली…
-
वेल – VEL
वाटेवरले टाळत धोंडे वेल कपारीवरी जिजीविषेने वर वर चढते वेल कपारीवरी चढता चढता पुढे लागता संगमरवरी घाट जगण्यासाठी खाली उतरे वेल कपारीवरी वेल न म्हणते मी तर नाजुक कशी कळ्यांना जपू मूक कळ्यांचा भार वाहते वेल कपारीवरी प्रकाश माती हवेत राहुन पाणी शोषायास हवे तेवढे वळसे घेते वेल कपारीवरी ऋतू फुलांचा वसंत येता बहरून सळसळुनी…
-
चैत्यालय – CHAITYAALAY
काळी काळी, काष्ठे शिसवी, रचून न्यारा, बनला अपुला, एक बंगलो, स्वतःत रमण्या… अनुपम चैत्यालय मनमंदिर, मूर्त पाहुनी, तीर्थंकर भक्तीत झिंगलो, स्वतःत रमण्या…. भक्तामर स्तोत्रातिल कडवी, अठ्ठेचाळिस, भक्तांसम कंठस्थ व्हावया,भक्ती केली… दर्शन केले, पूजन केले, जिनदेवाचे, गुणानुरागी होत खंगलो, स्वतःत रमण्या…. धुवांधार पावसात न्हाउन, उभी रिंगणे, गोल रिंगणे, करून नाचत चिंब जाहलो… वारीमध्ये, अभंग ओव्या म्हणता…
-
पुणे – PUNE
सिटी पुणे जसे तसे असेन मस्त स्मार्ट मी सिटीत पिंपवड जसे जगेन मस्त स्मार्ट मी सिटीत पिंपवडमधे सुजाण माणसे खरी तयातले कवीगुणी स्मरेन मस्त स्मार्ट मी वरून पिंपरी जरी जहाल खूप वाटते तिच्यामधील मार्दवा जपेन मस्त स्मार्ट मी सचैल चिंचवड पुरे भिजून चिंब पावसी तसेच पावसात या लिहेन मस्त स्मार्ट मी जलात नाच नाचती मयुर…
-
भीजपाऊस – BHEEJ PAAOOS
भीजपावसा अता भिजव मृत्तिका गावयास सावळी तलम मृत्तिका मृत्तिकेस बावऱ्या रंग लाव तू रंगल्यावरी घटास भरव मृत्तिका दाटल्या नभापरी वस्त्र जांभळे नेसवून घाटदार घडव मृत्तिका डौलदार चालते वीज प्राशुनी वाटते जणू सुरा सजल मृत्तिका गझल गात शिंपते चांदणे जळी वाहतेय सुंदरा तरल मृत्तिका गझल अक्षरगणवृत्त (मात्रा १९) लगावली – गालगालगालगा/गालगालगा/
-
दिलको दिलने छू लिया – DILAKO DILANE CHHOO LIYAA
जिंदगीका है भरोसा दिलको दिलने छू लिया छा गया दिलमे उजाला दिलको दिलने छू लिया बुझ गयी वाती दियेकी ना मिली माचीस मुझे खुद दिया वो जलने लगा दिलको दिलने छू लिया बन गयी बंजर जमी ये उड गये बादल तो क्या बरसता है खुद आसमा दिलको दिलने छू लिया गुफतगू करने लगे जब डालपर…
-
भृंग – BHRUNG
पैंजणात कंकणात वाज वाज तू शीळ घाल मुक्त गात नाच नाच तू रंगरूप साजिरे तुझे फुलापरी चुंबताच भृंग हो ग लाल लाल तू वेगवेगळ्या तुझ्या कलांस दावुनी चांदण्यात भीज आज चिंब चिंब तू ओळखून वृत्त मधुर प्राश रक्तिमा रंगवून ओठ ओठ गाल गाल तू गर्द कंच रान नील मोर नाचतो लेखणीस धार लाव मस्त मस्त…