Category: Ghazal

  • पिशाच – PISHAACH

    टोणा करणी करती भोंदू व्यंतर योनी मिळावया नर पशु पक्षी बळी देउनी पिशाच टोणी मिळावया तृतीय पंथी हिजडे हिजड्या फिरती दारी जगण्याला त्यांनाही दे मार्ग तपस्या शीतल लोणी मिळावया शुचिता हृदयी वाढत जाता संयम येतो कृतीमधे सत्य प्रकटते रत्नत्रय रत्नांची गोणी मिळावया आर्जव मार्दव ब्रम्हचर्य अन अकिंचन्य युत धर्म क्षमा पालन करती जीव एकटे प्रियतम…

  • लगाम – LAGAAM

    गझल लिहावी की कविता मी प्रश्न मला ना पडे अताशा लिहीत जाता स्फुटे मनातिल पाचोळा नच उडे अताशा शांत शांत हृदयातिल पाणी कुणा न दिसती तरंग त्यावर तरी स्तब्ध त्या सलिलावरती जिवंत नाते जडे अताशा संपुन गेले भय उरलेले लगाम काळाचा तव हाती त्यास बांधण्या सज्ज कपारी खुणावती मज कडे अताशा अक्षत अक्षत धुवून सुकवुन…

  • अग्गो – AGGO

    पृथ्वीवरची सून व्हायचे स्वप्न परी बघते आकाशी सूर्यासंगे ती तापाया बसते दसरा सण मोठा आल्यावर दिसे निळावंती झेंडू चाफा शेवंतीचा ढीग उभा करते सासूबाई कडक दामिनी ढग्गोबाईची अग्गो वहिनी नणंद ताई खुदूखुदू हसते नक्षत्रे अन चंद्रासंगे निशा गीत गाई तरणीताठी कृष्ण चांदणी नभात चमचमते धूमकेतु अन इंद्रधनूवर बसून झुलताना गझला लिहिण्या बॉन्ड “सुनेत्रा” कधीच ना…

  • आड -AAD

    पुन्हा बहरले कळ्याफुलांनी झाड सुबक ठेंगणे पुन्हा सजविले रहाट लावुन आड सुबक ठेंगणे उंच पोफळी नारळ बागा साद मला घालिती माझ्याशी बोलाया झाले माड सुबक ठेंगणे बांध बासनी ग्रंथ पुराणे अन पुस्तक रंगीत वाचायाला पाठवून दे बाड सुबक ठेंगणे तपवायाला दुग्ध चुलीवर मंदाग्नी असूदे ठोक्याचे घे पात्र स्टीलचे जाड सुबक ठेंगणे विरजवुनी कोमट क्षीराला ठेव…

  • गुंजन – GUNJAN

    आलिंगन हे दोन फुलांचे की चुंबन आहे नको नकोचा मस्त बहाणा की लंघन आहे गोष्ट जुनी ती आठवलीका नवी सदा वाटे गोष्टीमध्ये सारवलेले बघ अंगण आहे प्राजक्ताचा परिमल लहरे वाऱ्याशी खेळे सुमने वेचित किणकिणणारे तव कंकण आहे रांगोळीचे जोडुन ठिपके चित्र एक रेखू घर कौलारू सताड उघडे फुल-कुंपण आहे परसामध्ये गाय हम्बरे हुंदडते वासरू मुक्त…

  • नय दृष्टी – NAY DRUSHTEE

    मुक्त प्रकृती खुली संस्कृती ऊन मृदुल सावली संस्कृती निसर्ग सृष्टी अमूल्य वनचर हीच खरी आपुली संस्कृती प्रकृतीस मम ठेच पोचता मीच बुडविली जली संस्कृती धुवांधार पावसात भिजुनी पुन्हा पुन्हा सुकविली संस्कृती नय दृष्टीने वेध घेउनी सुनेत्रात टिकविली संस्कृती गझल मात्रावृत्त – मात्रा १६

  • पत्र पीयूष – PATRA PEEYUSH

    जपुन ठेवले अजुन अंतरी तुझ्या स्मृतींचे पत्र पीयूष जरी जाळले जरी फाडले पुरून उरले पत्र पीयूष अता न चिंता कशाकशाची पार जाहली सर्व संकटे सदा सुखाने जगावयाचे हृदयी भिजले पत्र पीयूष पऱ्या देवता रानपाखरे किलबिल त्यांची झाडावरती शिंपित उधळित दवबिंदूसम पानांवरले पत्र पीयूष गुणांस वाचत सुचल्या गोष्टी जादुई वनदेवींच्या मज त्यांस गुंफता कुसुमांभवती बनले गजरे…