-
पुफ्फ – PUFFA
🌺 काल जाता जाता एक गीत लिहीत मी गेलेकाल परवाची गोष्ट गीतातून भरे प्याले 🌺 🌺 प्याले म्हणू वा ते पेले जरी काचेचेच होतेत्याला चषक म्हणता नाजुक किणकिणले 🌺 🌺 अष्टक्षरी ओवली मी करू अष्टक मंदिरीतबकात अष्टद्रव्ये पूजेसाठी सजविली 🌺 🌺 नीर प्रासुक अक्षत गंध चंदनी खोडाचासुगंधित पुफ्फ शुभ्र चरु खडीसाखरेचा 🌺 🌺 दिव्व धूप…
-
लाल रेघा – LAAL REGHA
रोज वाचून घेरोज मोजून घे नित्य बोलू खरेरोज मांडून घे गाज गाजावयारोज गाजून घे लाल रेघा नव्यारोज खोडून घे ढेकळे मृत्तिकारोज कांडून घे प्रीत पुष्पापरीरोज प्राशून घे मी सुनेत्रा असेरोज जाणून घे
-
दीपक – DIPAK
थांबते ना टोचता पायी सराटा बैलजोडीनेतसे गाडी पुढे धुंडून वाटा बैलजोडीश्वेत आणी पीत संगे पद्म लेश्या..चक्र दीपकनील कापोती न आता कृष्ण लेश्या .. चक्र दीपक
-
विशेष – VISHESH
जगणे माझे रोज विशेषरोजच माझी पोज विशेषसशक्त तन मन दैवी शक्तीनयन भाल अन नोज विशेष
-
ज्ञानिये – DNYANIYE
पाण्यासाठी हवीच सरिताआकाशीची खगोल गंगामातपिता तेथेच राहतीचक्षु माझे तया पाहतीकोण देवता कोनाड्यातपूजन करण्या तत्वे सातविद्या सरस्वती जीवनीजिनवाणी मम आगम देवीशब्दफुले वाहून पूजलाकोणाडा ही मला पावलाभिंत न खचली गगन चुंबितेभिंतीवर ज्ञानिये बैसले
-
बाकी तरिही – BAKI TARIHEE
अर्ध्या हळकुंडाने ते का पिवळे झाले होतेबाकी काही नसले तरिही भरून आले होते भरून अंतर गदगद होता प्याल्यावर प्यालेथरथरत्या बोटांनी गझलाअजून प्याले होते जमिनीवरच्या सरपटणाऱ्या रांगा टाळायालाहवा खेळवुन फुफ्फुस भरता उंच उडाले होते टिम्ब टिम्बच्या रांगोळीवर मुक्त हस्त मम फिरताबरसायाला जलद त्यावरी जलद निघाले होते पुन्हा नवा मी मक्ता गुंफुन नाव सुनेत्रा लिहिताओळीवरती त्याच जुन्या…
-
माधुर्य – MADHURYA
माधुर्य चंद्रम्याचे किरणांत पारिजातअरिहंत देव प्रतिमा पुष्पात पारिजात फुलला सुवर्ण चाफा झेंडू गुलाब बूचमृदगंध बकुळ प्राशे परसात पारिजात मम माय धार काढे चरवीत दुग्ध धारघन रास माणकांची लक्षात पारिजात पाऊसधार गाते गातोय कल्पवृक्षमोती नि पोवळ्यांचा हस्तात पारिजात जास्वंद कुंडलांची डुलतेय माळ सिद्धताठ्यात गुलछडीसम बहरात पारिजात