-
बटुव्याची खीर – BATUVYACHI KHEER(SWEET DISH)
कणिक रव्याची घट्ट तिंबली किसणीवरती किसून घेतली पाटावरती उन्हात पसरून कीस घेतला कडक वाळवून कणकेचा मग फुलका लाटून केला त्याचा बटुवा दुमडून किसास भरुनी बटुव्यामध्ये तोंड दुमडले त्या बटुव्याचे फडताळे मग हळू उघडुनी बटुव्याला त्या आत ठेवुनी ख़ुशी ख़ुशी मन झाले हरिणी डोलू लागली मनात तरुणी येता संक्रांतीची भोगी बटुव्याची त्या खीर बनवली हाव हाव…
-
पाढा – PADHA(A MULTIPLICATION TABLE)
-
रंग फाल्गुनी – RANG FALGUNI(COLOURS OF FALGUN MONTH)
-
कुर्निसात – KURNISAAT(MAKING A BOW)
कुर्निसात माझा आता शुद्ध आत्मियाला देवा कुणापुढे वाकू का मी नाटकात यांच्या त्यांच्या कोणत्या पदाला सांगा आज काल पुसते कोणी माझे घर माझी नाती जपत जाय माझी प्रीती भाव लोळे काव्यरंगी माखुनी त्या घेय बुद्धी सुगंधाला आर्जवाच्या श्वास पुरवी भिजुन माती वेड आहे शुद्धतेचे म्हणून लिहिते रात्रं दिन जागते मी अर्थ देण्या एक एकेका शब्दास…
-
शास्त्रार्थ – SHASTRARTH(RELIGIOUS DEBATE)
जोमानं तारू किनाऱ्या लावू भावांची भूमिका चित्रात ओतू घामाच्या मोत्यांनी देहाला सजवू स्वच्छ जलाने अंघोळ करू शुभातून नंतर शुद्धात राहू संवर निर्जरा लक्षात ठेवू नेकीने टिकू युक्तीने विकू कर्तव्यपालन स्वधर्म पाळू धरून धर्मास संसार मांडू प्राणाचे हित साधत जगू स्वतःच्या जीवाला स्वतःच जपू दशधर्म शिडी बांधून घेऊ गुणांशी मैत्री संयम राखू सत्यास जागत काव्यात रंगू…
-
तंदुरुस्त – TANDURUST(HEALTHY)
अभंग ओवी ….. तंदुरुस्त पाप पुण्य लोप कर्म निर्जरेने होऊदे तो जेंव्हा व्हायचा असेल तनमन जपण्या राहू तंदुरुस्त जीव जीवासाठी घालतात गस्त प्रत्येकाची व्याख्या मोक्ष मुक्तीची हो असावी निराळी पंचम या काली वाम नवं तारू उजव्या तटाला सुखरूप येता सदाचारी शांत पुत्र वामादेवी तुझा प्राणप्रिय अश्वसेन पिता शोभतो क्षत्रिय क्षेत्रपाल रक्षे भूमी इंच इंच सुखे…
-
गुणानुराग – GUNANURAAG(DELIGHT IN GOOD QUALITIES)
रुबाई … शिशिर शिशिर ऋतूच्या प्याल्यामध्ये रस भरते सृष्टी तपोलीन पण ऋतू शिशिर हा नासाग्री दृष्टी धुके लपेटून साकी गाते देण्या त्याला काही नकोस नाकारू सौंदर्या ओंजळ भरून वाही ग झ ल … गुणानुराग श्रीमंती अंतरी रत्नत्रय भावी मम समर्थ रक्षिण्या आत्मधर्म स्वामी शिशिराच्या प्याल्यात रस भरते सृष्टी ओंजळीत गोठवुन दशधर्म दावी ऋतु शिशिर तपोलीन…