Category: Marathi kaavya

  • तुझ्याचसाठी अजून मारुत – TUZYYACH SAATHEE AJOON MAARUT

    तुझ्याचसाठी अजून मारुत झऱ्याप्रमाणे वहात आहे सळसळणाऱ्या रवात त्याच्या सजल घनांचा निवास आहे उधळित सुमने सुगंध झुलती कलरव पक्षी वनात करिती भरून वाहे तुडुंब दुहिता निळी नव्हाळी जलात आहे पहाट वारा झुळझुळणारा उडवित जाई बटा लतेच्या खट्याळ त्याच्या अदांवरी या गझल गुलाबी फिदाच आहे सुकून गेली कधी करपली मृदूल माझी जरी फुलेही सतेज पर्णी हटेल…

  • माझ्यासारखी – MAAZYAASAARAKHEE

    कशाला तुलना करता तुम्ही माझी! अन्य कुणाशी! कारण मी आहे फक्त माझ्यासारखी! मला व्हायचही नाही अन्य कुणासारखं! कारण … मला फक्त रहायचय माझ्यासारखं! कारण माझं माझ्यावरच खूप खूप प्रेम आहे… आणि माझ्यावर जे कुणी प्रेम करतात, अगदी कुठल्याही अटीविना! त्यांच्यावर, मी सुद्धा प्रेम करते कुठल्याही अटीविना!!

  • तपकिरवाली – TAPAKIR VAALEE

    तपकिरवाली एक मावशी भाव खायची जरी आळशी इरसाल नि ती चालू इतुकी खवट खोबरे देय लापशी पुरती उडवे झोप शिंकुनी मधुर हसूनी मुग्ध षोडशी शिष्य तिचा जणु पुनव चांदणे कशास गुरुजी त्यास चाळशी वीज चपलिनी नजर ‘सुनेत्रा’ तिच्यातुनी तू नीर गाळशी

  • ती मद्रासी – TEE MADRAASEE

    ती मद्रासी सुबक ठेंगणी तो बंगाली बावरा वय सोळाचा कवी मनाचा जरी बोलका लाजरा काजळ नेत्री गजरा लागे रोज रोज मज साजणा एरंडाचे झाड आणखी लावु अंगणी मोगरा हातामध्ये चुडा चमकतो हसते बाला गोजिरी हळद खेळुनी गझलेमधली किती उजळला चेहरा जिन्यावरूनी डौलामध्ये चालत जाई सुंदरा दुरून कोणी रसिक पाहती म्हणते त्यांना सावरा काळ्या केसांचा अंबाडा…

  • काय लिहू मी – KAAY LIHOO MEE

    काय लिहू मी कैसे बोलू शब्द थांबती अडखळती मौन मुग्ध मन सखा सोबती अश्रू गाली झरझरती कधी अचानक बांध फुटोनी भावभावना फुसांडती अज्ञाताच्या कड्यावरोनी आवेगाने कोसळती प्रश्न दाटती कैक मानसी उत्तर त्याचे मिळेलका पुढच्या जन्मी तरी भेटुया गझलेच्या काठावरती तुझे नि माझे नाते कुठले मला सदाचे कोडे हे कोड्यावरती कोडी घालत शब्द वहीवर थरथरती नको…

  • मम सांजेचा रंग केशरी – MAM SANJECHAA RANG KESHAREE

    मम सांजेचा रंग केशरी निळी जांभळी निशा नाचरी प्रभात ल्याली हळदी शालू किती देखणी जरी बावरी सकाळ गोरी मस्त गव्हाळी विरघळलेली मधुर साखरी दुपार सोन्यासम झळझळते संध्या श्यामल दिसे लाजरी संधिकालची बेला सुंदर अधरांवरची जणू बासरी  

  • मंगल बेला – MANGAL BELAA

    मंगल बेला हळदी शेला गझल विड्यांचा शायर ठेला मुखचंद्रावर मस्त तजेला सुंदर स्वप्ने हवी निशेला अमर्त्य आहे माझा चेला