-
प्रतिमा – PRATIMA (IMAGE)
शुद्ध चांदीच्या निरांजनी या शुद्ध तुपासह वात तेवते; कारण आजी कापूस पिंजुन वळून वाती जपुन ठेवते. गाळुन जल हे आजोबांना नात गोमटी आणून देते, अभिषेकाने प्रभूची प्रतिमा कषाय मनीचे अपुल्या नेते. गुलाब, चंपक, जुई, मोगरा परडीमध्ये फुले जमवितो, खट्याळ नातू सर्वांआधी आईसाठी फुले निवडतो. आजी गाते भजन आरती बाळांसाठी अन अंगाई, बाबा रचती कवने गीते…
-
दीड शहाणे – DID SHAHANE (WISEACRE)
In this poem the poetess wants to say that in this world people who work with good intention are decided mad by selfish people. Creativity or creative work is important in our daily routine life. जग वेडयांचे होते तेव्हा शहाणे होते थोडे अति शहाणे झाले सारे वेड्यांना पडले कोडे जग वेडयांचे छान साजरे फुला-मुलांची गर्दी…
-
राजहंस – RAJ-HANSA(SWAN)
Here in this poem, the poetess, describes the beauty of this Raj-hansa. Raj-hansa stays in her heart. It’s wings are like petales of lotus flower. Rajhansa tells her to wake up and escape him. But the poetess says, How she should escape him? because she also is waiting for him to come and escape her.…
-
बाणा – BANA(ATTITUDE)
-
मनमौजी – MANMOUJI(OPINIONATED)
-
झालर काळी – ZALAR KALI(BLACK FRILL)
पापणीस तव झालर काळी थरथरणारी अतीव सुंदर नकोस मिटवू उघड पाकळ्या कमलदलांसम सजीव सुंदर कधी वाटते खूप रडावे कारण त्याचे नकळे मजला अश्रु-विमोचन करता फुलते अंतरातली उणीव सुंदर मन घाबरते वादळ येता मेघ सावळे मनी दाटता कोसळतो मग तांडव करुनी हवाहवासा वळीव सुंदर शीळ घालतो अवखळ वारा श्यामल शीतल मेघ नाचरे बरसुन विणती अवनीवरती मोर…
-
घर कौलारू – GHAR KOULARU(TILED ROOF HOUSE)
ओठांमध्ये पालवलेले बोलायाचे आहे मजला चित्रामध्ये आठवलेले रेखायाचे आहे मजला चितारते मी सागर नयनी मिटते डोळे गाज ऐकुनी डोळ्यामध्ये रंगवलेले वाचायाचे आहे मजला रंग-गंध वेचून फुलांचे मधुसंचय मी करित राहिले श्वासामध्ये साठवलेले प्राशायाचे आहे मजला शेकोटीची उब जांभळी शब्द कापरे तप्त जाहले काव्यामध्ये तापवलेले ओतायचे आहे मजला तव झुळकीने मोहरलेल्या कळ्याफुलांचे मुग्ध रंग हे हृदयामध्ये…