-
संक्रांतीला लुटू – SANKRAANTEELAA LUTOO
संक्रांतीला लुटू अक्षरे चला सख्यांनो शब्दफुलांचा फुलवू सुंदर मळा सख्यांनो भेटण्यास या काव्य घेउनी मला सख्यांनो गाउन त्यांना खुलवू अपुला गळा सख्यांनो सुगंध भरण्या रंगबिरंगी मनात कोमल कुसुम कळ्यांसम शिकू नवनव्या कला सख्यांनो घटात भरुनी नीर मृत्तिका प्रेम पेरता निसर्ग होइल मित्र खरोखर भला सख्यांनो तीळ-गुळासह हळदीकुंकू पानसुपारी देउन टळवा कपोलकल्पित बला सख्यांनो जादूटोणा बलीप्रथेचा…
-
मम हृदयाची – MAM HRUDAYAACHEE
मम हृदयाची सतार वाजे दिडदा दिडदा अन गझलांची सतार वाजे दिडदा दिडदा मनापासुनी पोळ्या लाटे आई जेव्हा तिच्या करांची सतार वाजे दिडदा दिडदा वृत्त वेगळे जुना काफिया रदीफ घेउन शब्द शरांची सतार वाजे दिडदा दिडदा अंतरातले भाव सांगण्या मते मांडण्या मृदुल जिव्हांची सतार वाजे दिडदा दिडदा बिजलीचा कडकडाट होता वादळराती कृष्ण घनांची सतार वाजे दिडदा…
-
सुनेत्रा – SUNETRA
नाम रेखिते श्यामल भाळी टिळा लाविते गौर कपाळी भालप्रदेशी चंद्रकोर अन शुक्राची चांदणी सकाळी झाड उभे हे ध्यानासाठी मांजर म्हणते पुरे टवाळी नदीतटावर उभी राधिका शोधायाला घागर काळी दिवा लाविता अंतर्यामी म्हणे सुनेत्रा हीच दिवाळी मात्रावृत्त (८+८=१६ मात्रा)
-
रंगत गेल्या पुन्हा मैफिली – RANGAT GELYAA PUNHAA MAIFILEE
रंगत गेल्या पुन्हा मैफिली दूर जरी तू माझ्यापासुन माथ्यावरती तुझी सावली दूर जरी तू माझ्यापासुन रखरखणाऱ्या उन्हातसुद्धा छायेमध्ये तुझिया आई भिजली पाने सर्व चाळली दूर जरी तू माझ्यापासुन भेट न आता प्रत्यक्षातिल ठाउक आहे म्हणून मी तव फोटोमधली छबी वाचली दूर जरी तू माझ्यापासुन करुणामय दो नयनांमधुनी फक्त प्रेम अन प्रेमच बरसे हाच दुवा अन…
-
आठवते मज – AATHAVATE MAJ
आठवते मज ऊन कोवळे गच्चीमधले झुळझुळणारे माझी कविता माझे गाणे नकळत माझ्या खळखळणारे धडपड तेव्हा केली होती अक्षर प्रीती पेरायाची लोटून माती मृदुल त्यावरी रिमझिम पाणी शिम्पायाची झाड फुलांचे अता बहरले सावलीत मी आहे आता भिजव मला तू चिंब फुलांनी हलवुन फांद्या येता जाता….
-
वळण – VALHAN
अक्षरातले वळण माझिया फक्त तुला अन तुला शोधते असावातली काजळ रेषा तुझ्याचसाठी फक्त वाहते उकार वेलांटी अन मात्रा तुला आठवुन कंपित होता पापणकाठी थरथरणारी तुझी सावली अधर चुंबिते …
-
बोल मना – BOL MANAA
बोल मना कवाड उघड दारे खिडक्या सताड उघड घडा घडा बोलत जा साठलं पाणी ओतत जा पाऊस मग येईलच चिंब चिंब भिजवेलच भर पुन्हा रिता घडा चढत जा उंच कडा कड्यावरती ढगच ढग डोळे भरून त्यांना बघ डोळे तुडुंब भरुन येतील झरझर अश्रू झरुन जातील मन बनेल आरसपानी गाण्यासाठी सुंदर गाणी