-
लंकेवरी – LANKEVAREE
विजयपताका फडकत राहो तशीच लंकेवरी अता उभारू करकमलांची गुढीच लंकेवरी जिनानुयायी खराच रावण पुराण अमुचे म्हणे म्हणून राउळ मशीदसुद्धा नवीच लंकेवरी खुडेन दुर्वा भल्या पहाटे जुड्या फुले वाहण्या गणेश भक्ती तुझी दिसूदे अशीच लंकेवरी कलीयुगाची अखेर बघण्या सरळ रचूया जिना उभी करूया मुला-मुलींची फळीच लंकेवरी फितवुन कोणी म्हणेल जरका तिथे रहाती भुते करायचीना उगाच स्वारी…
-
माय मऱ्हाटी – MAAY MARHAATEE
माय मऱ्हाटी जिनवाणीसम देवा आम्हाला इंग्लिश देते नात तिचीरे सेवा आम्हाला कन्नड हिंदी गुजराथीने मऱ्हाटीस जपले तमिळ तेलगू उर्दू भरवी मेवा आम्हाला बंगालीचे बोल गोड बघ कटुता तुळु विसरे मल्याळीही संगे म्हणते जेवा आम्हाला प्रगती पाहुन गुणीजनांची मुनीवर आनंदी कधी न वाटो गुणीजनांचा हेवा आम्हाला रत्नत्रय हे हृदयी मिरवू खरी संपदाही पुण्यभूमिवर हाच मिळाला ठेवा…
-
भूमी ताई – BHUMEE TAAEE
पृथ्वी धरती भूमी ताई करिते नावे धारण सुंदर क्षमाशीलता तिची प्रकृती मौन घनासम पावन सुंदर शुभ्र मोगरा पर्णदलातिल सुरभित कोमल तसे शब्द हे मार्दव असते या कुसुमांसम तसेच बोलू आपण सुंदर हृदयापासुन खरे बोलतो वचनांसम त्या कृतिही करतो तोच खरा रे गुरू दिगंबर त्याचे आर्जव पालन सुंदर शौच शुद्धता अंतःकरणी असते तेव्हा ते अतिमोहक अश्याच…
-
पर्व पर्युषण – PARVA PARYUSHAN (jain festival)
भाद्रपदातिल शुक्ल पंचमीस पर्व पर्युषण येते खास तिथिस या नेमाने मग प्रियची आठवण येते प्रिय म्हणजे जो हृदयी वसतो व्यर्थ न भटकत बसतो धर्म अहिंसा स्थापित करण्या मनामधे अवतरतो देवघराचा मोह न प्रियला प्रियवर मोहित सैनी पुण्यभूवरी प्रियसाठी नव मंदिर बांधे जैनी क्षमा मार्दवे जीव शोभतो आर्जव सुवर्ण कंकण देह शुद्ध अन हृदयी शुचिता हे…
-
गझलसदृश्य – GAZAL SADRUSHYA (some what like ghazal, but not in proper ghazal meter)
जर्द रवीला जाळ म्हणूया भडक फुलांची दुशाल म्हणुया करे प्रदर्शन दानाचे जी तिजला बोली सवाल म्हणुया स्वच्छ मनाचे मुलगे जे जे त्या मुलग्यांना बाल म्हणूया पक्षपात जो कधी न करतो त्याला सुंदर काल म्हणूया कटकट मोडे त्या काष्ठाला मस्त भिजोनी वाळ म्हणूया जीव जीवाला जीवच म्हणतो पुदगलास पण माल म्हणूया सिंहकटीसम कमर जिची तिज चाळ…
-
गालगाल – GAAL GAAL
-
तगडा – TAGADAA(strong)
पाठीमागे कर्तव्याचा लकडा होता पगडीवरती परंपरेचा पगडा होता स्वप्ने होती नेत्रांमध्ये स्वातंत्र्याची कवी मनाचा तरी तवाना लुकडा होता विमान नव्हते बाइक नव्हती सायकलसुद्धा वाहन त्याचे दो चाकांचा छकडा होता उजळ भाल ते उंच नासिका हाती सोटा असा चेहरा भाव त्यावरी करडा होता जमीन होती कसावयाला हृदयी श्रद्धा तब्येतीने धडधाकट अन तगडा होता