-
सा रे ग म प ध नी सा – SAA RE GA MA PA DHA NEE SAA
सा रे ग म प ध नी सा सा नी ध प म ग रे सा जीव म्हणे म्हण गाणे गात जाय घन गाणे रातराणि फुल वाती काजव्यात फुलताती समईच्या दीप कळ्या बघुनीया तम पळे वाट जरी वळणाची ओळखिची चढणीची गात गात घाट चढे रानातुन जाय पुढे सा रे ग म प ध नी सा…
-
उनाड – UNAAD
सांग मला भेटण्यास त्या उनाड पारव्यास अंतरात साठवून प्रेम उतर नाचण्यास ये इथेच राहण्यास पावसास पाडण्यास भीत नाय मी कधीच आषाढी गारव्यास भाग पाड लबाडास खरे तेच बोलण्यास मोल असे जाण अता गात गात खिदळण्यास जन्म घे पुन्हा पुण्यात सुनेत्रास हरवण्यास
-
यंत्रयुग हे ते – YANTR YUG HE TE
पोट झडाया डोकयंत्र हे ते सोकविण्या मन सोकयंत्र हे ते टोक कराया टोकयंत्र हे ते पाठ कराया घोकयंत्र हे ते विनोद सांगे जोकयंत्र हे ते हळू टोचण्या पोकयंत्र हे ते नशा यावया झोकयंत्र हे ते चोप द्यावया फोकयंत्र हे ते मागे ओढी ढोकयंत्र हे ते इंजिन पळवी कोकयंत्र हे ते दिशा सांगण्या होकयंत्र हे ते…
-
कीर्द खतावणी – KEERD KHATAAVANEE
कुणी कुठून आणली कीर्द खतावणी फुका पुसे खडूस बोचरे प्रश्न असे तसेच का हवीस तू मला गडे बोलतसे फुलास तो अशाच सांगुनी कथा रमवतसे स्वतःस का कधी उशीर जाहला फी तुज द्यायला मला उगाच चौकशा करी सांग मिळे पगारका हिशेब छान शिकविले शिस्त जरी कडक असे हुशार मी खरी खरी जाणुन गोष्ट मौन का गुरूपणा…
-
बाकी – BAAKEE
काय राहिले सांग प्रियतमा लिहावयाचे बाकी किती राहिले पत्थर अजुनी भिजावयाचे बाकी दगडावरती साठत गेली बांधावरची माती बोल केवढे अंकुर आता रुजावयाचे बाकी कैक भरवल्या खतावण्या तू लिहून भाकड गोष्टी पात्र कोणते कथांतल्या त्या रडावयाचे बाकी चंचलपण तव नकोस मिरवू उघड चंचले चंचू उकरुन माती टाक पुरून जे पुरावयाचे बाकी पोपटपंची नको नाटकी पूस ‘सुनेत्रा’…
-
मुनी दिगंबर जैनी – MUNEE DIGAMBAR JAINEE
निर्मलतेचे शिल्प गोजिरे मुनी दिगंबर जैनी कमंडलू अन पिंछी त्यांची पूजनीय मन्मनी वीतराग विज्ञान जाणुनी जैन धर्म जाणा आत्म्याचे हित करता करता साधा परमार्था खऱ्या दिगंबर साधू पुढती लोटांगण घाला अंधश्रद्धा पूर्ण उखडुनी हृदयी जागवा श्रध्दा निंदा करण्याआधी त्यांची आत्मपरीक्षण करा पूजा करुनी आत्मगुणांची दशधर्मांना वरा वेगामध्ये वाहनावरी रस्त्याने पळता तुम्हीच अपघाताला तुमच्या आमंत्रण देता…
-
लेश्या – LESHYAA
तूच बनविले तिजला वेश्या तिच्याभोवती रेखुन लेश्या अपंग असुनी तिला भोगले वर म्हणशी की लाड पुरविले कुण्या जन्मीचा असशिल वैरी राब राबवुन दिलीस कैरी तुझी लक्तरे वेशिस टांगुन दमली तीही नाचुन नाचुन पुरे नाच हा आता नंगा कितीजणांना खाशिल आता तुझी कुरुपता तिला न डसली ती तर सौंदर्याची पुतळी नियत स्वतःची रोज लिहावी पापेसुद्धा रोज…