Category: Marathi kaavya

  • कालसर्प – KAAL SARP (“serpent of time defect”)

    राहू-केतू कुंडलीतना मनात अपुल्या आहे कालसर्प हा पत्रिकेतना विकृतीत आहे कशास पूजा निवारणाला दोष मतीतच आहे सम्यकत्वी जो असतो त्याला वीष न असले चढते मिथ्यात्वाचे पालनपोषण अज्ञानाने होते अज्ञानाला दूर करूया धर्म खरा जपण्या सम्यकज्ञानी शूर वीरांची चारित्र्ये फुलण्या

  • कॅमेरे – CAMERAS

    बास झालं लिहिणं बिहिणं चल आता हुंदडायला अंगणातल्या झाडावरचे पिवळे गुलाब मोजायला उमलते गुलाब टपोऱ्या कळ्या खिदळतात हसतात वेड्या खुळ्या डोळ्यांचे कॅमेरे दोन दोन फुलांचे फोटो घेतंय कोण हिरव्या पोपटी पानांवर गुलाबाच्या गालिच्यावर प्रेम तुझं नि माझं हसतंय पाकळी पाकळ्यांवर तेवढ्यात आल्या कित्ती बाया साळकाया अन माळकाया फुलं तोडून पसार झाल्या माझं हसू घेऊन गेल्या…

  • नीतळ चष्मा – NEETAL CHASHHMAA (Clear glasses)

    टाक झाडुनी वाकुन वाकुन पाला पाचोळा स्वच्छ कोपरा बघून त्याला कर लवकर गोळा ढीग पडे हा झोपाळ्यावर धुतल्या वस्त्रांचा नकोस घालू घड्या बिड्या तू कर चोळामोळा नीतळ चष्मा घाल धुळीतिल करताना कामे उडता कचरा डोळ्यामध्ये धू लवकर डोळा दगडासम बघ तनमन झाले जागी हो आता झोके देण्या मनास सखये बांधच हिंदोळा गाई गुरांना खाण्यासाठी बनव…

  • दूत – DOOT (messanger)

    पावसाचे दूत आले उठव रे अता पाले जागा भिंती छप्पराची जिथे वाळू अंगणाले झाडझूड स्वच्छ कर रांगणारे बाळ चाले चहा कर आम्हासाठी ठेचूनिया घाल आले करायचे खूप काही नको म्हणू झाले झाले हाक मार प्रेमाने तू सून म्हणे आले आले लेक आणि जावायाला सांग ठेवायला भाले मानपान कर नीट आले सारे साली साले सुनेत्राचा गोतावळा…

  • कविता रडली – KAVITAA RADALEE (poem cried)

    माझ्यामध्ये गझल उमटली तेव्हा माझी कविता रडली रडता रडता हसू लागली टपोर मोती उधळत खुलली फुलली गळली पुन्हा प्रकटली मुग्ध कळ्यानसम लाज लाजली लाजेचीही लाज वाटता ठिणगीसम ती फुलू लागली पाऊस पाडून मग ठिणग्यांचा लज्जेला ती जाळत गेली निर्लज्जांसम निडर बनली वीज होऊनी गगनी गेली मेघांना ती चोपून आली झरझर धारा वर्षत असता त्यांच्यासंगे नाच…

  • चळवळ – CHALVAL(movement)

    पुन्हा नव्याने सुरू करूया चळवळ जैनत्वाची शुद्ध जाहल्या जलात उठुदे सळसळ जैनत्वाची विशाल व्यापक जाणिव जागृत धर्मामध्ये असण्या नको नाटकी अता वहाया भळभळ जैनत्वाची बौद्धत्वाचा हिंदुत्वाचा ब्राम्हण्याचा हेका सैल करावा सुखद वाहण्या झुळझुळ जैनत्वाची शीख पारशी मुस्लिम ख्रिस्ती अपुले बांधव हे त्यांच्यासंगे निर्झर व्हावी खळखळ जैनत्वाची क्षात्रतेज अन छात्र गुरूंचा मस्त मराठी बाणा तीर अक्षरी…

  • जलद तोटी – JALAD TOTEE (tap of cloud)

    कश्शाला पाऊस पडेल सांगा कशाला पाऊस पडेल बाई हृदय भरून येतच न्हाई वाऱ्याची झुळूक चुंबत नाही सच्छिद्र देह झरत नाही डोळ्यात आसवे भरत नाही पापण दले हलत नाही पाऊस थेंब पडत नाही लिहीग सई काहीबाही लिहित रहा मंगल गाणी दवाच्या बिंदूंचे साठव पाणी मिसळ त्यात गारांचे पाणी बुडव तयात मातीचे हात सारव तयांनी अंगण गात…