-
बाकी – BAAKEE (remaining)
काय राहिले सांग प्रियतमा लिहावयाचे बाकी किती राहिले पत्थर अजुनी भिजावयाचे बाकी दगडावरती साठत गेली बांधावरची माती बोल केवढे अंकुर आता रुजावयाचे बाकी कैक भरवल्या खतावण्या तू लिहून भाकड गोष्टी पात्र कोणते कथांतल्या त्या रडावयाचे बाकी चंचलपण तव नकोस मिरवू उघड चंचले चंचू उकरुन माती टाक पुरून जे पुरावयाचे बाकी पोपटपंची नको नाटकी पूस ‘सुनेत्रा’…
-
बोर जाहले बोर – BOR JAAHALE BOR (I am very bored)
-
बोला आता खरे खरे – BOLAA AATAA KHARE KHARE (now speak the absolute truth)
मुदत संपली लपवायाची बोला आता खरे खरे सांगुन सांगुन दमलो चिडलो सत्यच सांगा खरे खरे कशास केली लपवाछपवी भले कुणाचे करावया अता न कुठली वाट तुम्हाला इकडे तिकडे पळावया चारित्र्याचा मिरवित तोरा फिरला तुम्ही इथे तिथे चारित्र्याची ‘असली’ व्याख्या तुम्हा कळाली कधी कुठे भ्रमात भिजवुन बुद्धी अपुली काय जाहले जीवाचे अहंकार अन हवस मनाची लाड…
-
अव्वल – AVVAL (topper)
नव्या युगाचे सुंदर माझे गाणे ऐकत आहे अंबर माझे गाणे लेखणीतुनी झरती जैसे मोती हृदयामधले घुंगर माझे गाणे रक्तपात अन टाळत अकाल मृत्यू जिंकिल आता संगर माझे गाणे फुलण्यासाठी हिरवी सृष्टी बनते निळ्या नभातिल झुंबर माझे गाणे सदा ‘सुनेत्रा’ साऱ्यांमध्ये अव्वल पहिला पहिला नंबर माझे गाणे मात्रावृत्त – (८+८+४=२० मात्रा)
-
बाईपणा – BAAEEPANAA (womanhood)
रत्नात रत्न सुंदर बाईपणाच माझा सांगे लिहावयाला आईपणाच माझा संस्कार वर्ग माझा शिकण्यास रीतिभाती जपतो मुलाफुलांना दाईपणाच माझा ती मूढता तयांची वेगास खीळ घाली नडणार कोडग्यांना घाईपणाच माझा मम लेखणीत शिरुनी या वासरीवरी रे मांडेल भावनांना शाईपणाच माझा नसते कुटील कपटी माया खऱ्या गुरुंची मायेस साक्ष त्यांच्या माईपणाच माझा जेथे नको तिथेही हे मारतात शेरे…
-
सोक्ष मोक्ष – SOKSH MOKSH (disposal of a matter)
फक्त फुलंच बनलो तर फुलायचं पूर्ण! उमलून यायचं पाकळी पाकळीनं … फूल रंगीत पाकळ्यांचं, फेनधवल पाकळीचं किंवा सुंदर पाकळ्यांचं! सुगंध उधळणारं मोहक फूल! कोणतही फूल आनंदी फूल… कधी देवाच्या पूजेत रमायचं कधी बुकेत तर कधी गजऱ्यात दाटीवाटीने बसून खिदळायचं हसायचं ! कधी झाडावरच डुलत रहायचं मजेत गाणी गात… वाऱ्यानं कधी केसर शिम्पताच जमिनीवर पडायचं परत…
-
तहान – TAHAAN (thurst)
मूळ झालो काय किंवा डहाळी झालो काय काम तर करावंच लागणार ज्याला त्याला ज्याचं त्याचं ! मूळ झालात तर घ्या मातीत गाडून पाणी शोधायला पसरा हात पाय बोटे तहान कोण्या कैक जन्मांची असतेचना प्रत्येकाला ! म्हणूनच मुळाला करावं लागतं पाणी प्यायचे काम… त्याची तहान भागलीकी मग जमीन उघडते द्वार अंकुर येतो त्यातून वर खोड होण्यासाठी!…