-
मज्जाव – MAJJAV
गाता गझल गीत लिहिले मक्त्यात नाव रक्ताने रक्तपात टळण्या केला पुन्हा मज्जाव रक्ताने पाऊलवाट मळवाया का रचू डाव रक्ताने शब्दांनी भळभळणारे का भरू घाव रक्ताने औषधा मसी ना उरली लेखणी शिशाविन पोकळ भेदले लक्ष्य बाणाने हेरून भाव रक्ताने चटक ना रक्त मासाची पुरविण्या लाड रसनेचे हे हृदय न कत्तलखाना बुडविण्या हाव रक्ताने सळसळते सत्य रक्तात…
-
दवा जादुई – DAVAA JADUI
मीठ नि मिरची हिंग मोहरी नजरउतरवे भरभर मी तप्त निखारे दृष्ट काढुनी तिथे फेकते झरझर मी अंतर मिटण्या अंतरातले जपू कोणता मंतर मी प्रश्न मिटे पण शब्द वितळती भरे अक्षरी कर्पुर मी ..हुस्ने मतला १ जिनवाणीतिल भाव जोडुनी जिना बांधते मंदिर मी किणकिणणारे वात लहरता कधी त्यातले झुंबर मी … हुस्ने मतला २ वृत्त जपूकी…
-
हे तर सोने – HE TAR SONE
-
शांत रस – SHAANT RAS
-
दीप दीप – DEEP DEEP
-
कारण – KAARAN
कारण चपखल रुतते आहे कारण त्याचे सलते आहे शब्द चोरटे गाली हसता कारण नकळत फिरते आहे चोरांच्या उलट्या बोंबांनी कारण तिळतिळ तुटते आहे फुलवायल वा असो पैठणी कारण वरवर चढते आहे पुफ्फ सुगंधी दरवळणारे कारण सौरभ झरते आहे मधमाशीसम बछड्यांसाठी कारण कारण लढते आहे घुम्या वेदना घुमत राहती कारण पुरुनी उरते आहे भरून पिंडी आनंदाश्रू…
-
पैठणी – PAITHANI
हलकी फुलकी नवी पैठणी स्वाभिमान जागवी पैठणी किणकिण मंजुळ नाजुक घंटा सोळाकारण हवी पैठणी रत्नत्रय धन जिनानुयायी कूळ मिरविते कवी पैठणी गवळण गरगर करात फिरवत मंथन करते रवी पैठणी मोरपिशी इरकली वहीवर कुसुमांकित माधवी पैठणी कवयित्री क्षत्राणी नारी मृदुल पात पालवी पैठणी पहाटवाऱ्याने सळसळते भिजते सुकते दवी पैठणी