Category: Marathi kaavya

  • दीप दीप – DEEP DEEP(LAMPS)

    दीप दीप लक्ष दीप तेवतात शांत दीप चंद्र शुक्र गगन दीप देह चैत्य आत्म दीप अंतरात लाव दीप गझल वात भाव दीप मम सुनेत्र दोन दीप  

  • कारण – KAARAN(REASON)

    कारण चपखल रुतते आहे कारण त्याचे सलते आहे शब्द चोरटे गाली हसता कारण नकळत फिरते आहे चोरांच्या उलट्या बोंबांनी कारण तिळतिळ तुटते आहे पुफ्फ सुगंधी दरवळणारे कारण सौरभ झरते आहे मधमाशीसम बछड्यांसाठी कारण कारण लढते आहे घुम्या वेदना घुमत राहती कारण पुरुनी उरते आहे भरून पिंडी आनंदाश्रू कारण जखमा भरते आहे क्षण क्षण बाकी जगे…

  • पैठणी – PAITHANI(A TRADITIONAL HANDWOVEN SILK SAREE FROM PAITHAN INDIA))

    हलकी फुलकी नवी पैठणी स्वाभिमान जागवी पैठणी किणकिण मंजुळ नाजुक घंटा सोळाकारण हवी पैठणी रत्नत्रय धन जिनानुयायी कूळ मिरविते कवी पैठणी गवळण गरगर करात फिरवत मंथन करते रवी पैठणी मोरपिशी इरकली वहीवर कुसुमांकित माधवी पैठणी कवयित्री क्षत्राणी नारी मृदुल पात पालवी पैठणी पहाटवाऱ्याने सळसळते भिजते सुकते दवी पैठणी  

  • मिथ्या – MITHYA (FALSE)

    कशास काढू उणीदुणी मीकशास नसती धुवू धुणी मी लगावली मृदु लगालगागाकशास झिंगू झिनी झिणी मी कुलूप किल्ल्या करास माझ्याकशास धुंडू तयां खणी मी सुनेत्र माझे सुवर्ण सम्यककशास गुंतू सरळ फणी मी कुरण हवेली दवारलेलीकशास झाडू कुडा रणी मी स्तुती जिनांची लिहू सुनेत्राकशास मिथ्या विणू विणी मी

  • क्लीक – CLICK

    कशास करु मी क्लीक कुठेहीछायचित्रे मिळवाया…प्रसन्न साकी माझ्यावरतीसृष्टी सुंदर दावाया….कशास फोटो पाहू आतातूच ठाकता पुढ्यात रे…ओढ निसर्गा तुझीच मजलातुझ्या मनाचा फोटो दे…. मित्र सखा अन ईश्वर गुरु पणनिसर्ग आहे मनुजाचा …हवीच साकी जिनवाणी ममस्फुरण्यासाठी काव्याला … मला न चिंता भीती कसलीनिसर्ग देवा तुझ्यासवे…अंतरीचा जिनदेव दाखवीबिंब मनोहर तुझे खरे … सूर्योदय सूर्यास्त पाहतेरोज तरीपण नवा नवा…

  • मजबूत – MAJBUT (STRONG)

    कशास रे होडी हवी हात पाय मजबूतमोठे विक्राळ सागर केले पोहून मी पार माझ्या हृदयी कंदील ज्योत त्याची तेवणारीत्याच्या प्रकाशात पीत निळा समुद्र पेलला सारेगमपधनीसा सूर लागले गगनीलाल पेटले अंबर घन काळे गोठवूनी कुठे कुणी कसे कोण काय प्रश्न कुंडलीचेअश्या कुंडलीचे प्रश्न चुलीलाच भरवले माझ्या माजी कुंडल्यांची राख खाक झाली आजराखेचे त्या उटणे मी आज…

  • अंगी – ANGEE ((BABY SHIRT)

    कपड्यांची ना तंगी ओळखकट्यार लखलख नंगी ओळख समोर डोंगर जमाल बाबूरम्य कुटी मम जंगी ओळख गिरिबाळांचे स्नान जाहलेमृदुल पोपटी अंगी ओळख अनेकान्त शैली स्याद्वादीधारा सप्तम भंगी ओळख भद्र भाव घन कळस चुंबितीश्वासांची नवरंगी ओळख