दर्शन दे ईश्वरा…
भिवविते जन्म मरण अन जरा
चमत्कार हा असा घडावा
मनातला भ्रम गळुन पडावा
कटू जरी मज सत्य कळावे
इच्छा ही प्रभुवरा…
हृदयी गुंता होऊन बसता
अज्ञानातिल सुख कुरवाळता
एक घाव अन दो तुकडे हा
उपाय वाटे बरा…
आस मनीची पूर्ण होऊदे
प्रेमामध्ये चिंब न्हाऊदे
खरे न खोटे सारे कळूदे
भेट मला प्रियकरा…