Category: Marathi kaavya

  • जिन राहतो – JIN RAAHATO

    जिन राहतो माझ्यासवे माझ्या घरी मम अंतरी सांगू कशाला हक्क पुद्गल सांडल्या शब्दांवरी मी पाहिल्या अन ऐकल्या गोष्टी किती भूतातल्या पण वर्तमाना जागते जगण्या कथा लिहुनी खरी मधुचंद्रमा पूर्णाकृती माथ्यावरी घन सोबती दुग्धातल्या बिंबासही भिजवावया आल्या सरी फुलुनी कळ्या गंधाळता जाईजुईचा ताटवा कोजागिरीच्या अंगणी शांती इथे नांदे खरी मौनातली झाडे पुन्हा करतात जेव्हा लावणी येते…

  • सुंदरता – SUNDARTAA

    मोर नाचतो नाचनाचतो भूमीवरती राजहंस पण जळी विहरतो भूमीवरती राजहंस वा मोर असूदे जीवच दोघे सुंदरतेला जीव जाणतो भूमीवरती

  • मयुरवाहिनी – MAYUR VAAHINEE

    मयुरवाहिनी सरस्वती शारदा सुंदरी मयुरवाहिनी वीणा पुस्तक शीलधारिणी मयुरवाहिनी मोरपिसांच्या पिंछीचा मृदु स्पर्श मुलायम जागवितो तव सयी अंतरी मयुरवाहिनी काळ्या कोऱ्या पाटीवरती नऊ रसांच्या रेषा तोलत उभी लेखणी मयुरवाहिनी जललहरींचे वसन धवल घन दले गुलाबी कंच पाचु तनु मनगट हळदी मयुरवाहिनी चित्र रेखुनी फुलवेलीचे रंगबिरंगी कलम टेकवुन उभी पद्मश्री मयुरवाहिनी करात नाजुक स्फटिक मण्यांची माला…

  • अंगठा – ANGTHAA

    अंगठा… हिरवी पाने पसाभर आत्महिताचा वसा वर शक्य झाल्यास सहज तू भ्रष्ट राज्य खालसा कर परत परत पाड नाणी रिक्त झालाय कसा तर गुंफुन सयी बकुळ फुले घाल गळा छानसा सर आयुष्याचं सोनं झालं जपत अंगठा ठसा धर

  • माझे मुली – MAAZE MULEE

    हवेसारखो अवतीभवती सदैव माझ्या असतेस तू… दूर कुठे इथेच घरभर रंग उधळित असतेस तू… मुक्तछंद झऱ्यासारखी खळाळत वाहत रहा … तुझा आनंद जाशील तिथे मुक्त मुक्त उधळत राहा .. … माझे मुली सांग तुला काय देऊ… माझ्याकडून … आज भेट… तूच दिलास तुझ्या रुपात.. अनमोल ठेवा भेट… तुझा जन्म तुझा आहे .. तुझ्यासाठी जगत रहा…

  • फापटपसारा – FAAPAT PASARAA

    कवीच्या जाण्याचे दुःख .. कवी नावाच्या संवेदनशील हृदयाला होतच असते… कारण… त्याच संवेदनशीलतेने… त्यानेही टिपलेली असतात … हळुवार मनाची स्पंदने…….. कधी हाताच्या बोटांची थरथर… कधी पूर्ण अंगावर अचानक उठलेले शहारे …. बोलत असतात…. त्याच्याच भाषेतून…. ती भाषा…. कुठल्याही पुस्तकात वाचून शिकता येत नाही…. त्या भाषेला व्याकरण नसतं … फक्त भाव असतो…. ते अनुभवत कवीचं हृदय…

  • हुमान – HUMAAN

    कोडे कसले हुमान हे तर माझ्यामधले इमान हे तर गगन भरारी घडवायाला दारी आले विमान हे तर लपवुन काही कशास ठेवे मला दावते गुमान हे तर मन माझे मज मुक्त सोडते करे न कधी अनमान हे तर भरून माझ्या अंतरात रे सदैव राखुन मान हे तर अश्रू नेत्रांमधून गाळू काम करूया किमान हे तर सामानावर…