Category: Marathi kaavya

  • चरखा – CHARKHAA (SPINNING WHEEL)

    न पिते न खाते का बाई हरवून जाते का बाई चरखा फिरवुनी सूत जमे तेंही न काते का बाई पाऊस येता शब्दांना विसरून गाते का बाई फसवून पळवे प्रीतीला फिरवून नाते का बाई फिरवीत बसते कलम नवे घासून पाते का बाई

  • मोतीमाळ – MOTEE MAAL( PEARL NECKLACE)

    लिहावी वाटते जेंव्हा कविता .. तेव्हाच लिहावी असं काही नाही कामे करता करताही लिहावी कविता एखादी .. किंवा रस्त्यातून चालता चालताही …. लिहावी एखादी कविता.. कामे असतातच निकडीची …रोज रोजच्या जगण्याची… ती तर करायलं हवीतच आधी… त्यानंतर मग… लिहावीच एखादी मुग्ध कविता… वेळ काढून …मूड पाहून.. साठलेल्या भिजलेल्या शब्दांतून ,,उचलावेत काही शब्द…काही क्षण… आणि लिहीत…

  • जेली – JELLY (DESSERT)

    रांधली स्वतः मी कवठ गुळाची जेली कणकेस भिजवुनी निरांजने दो केली सुकवून तयांना दिवे तेवता दारी थरथरली पर्णे आम्रतरूची सारी

  • रत्नत्रय दीपक – RATNATRAY DIPAK (THE THREE JEWELS LAMP)

    अप्पदिवो मम अलख निरंजन नय दृष्टी सम अलख निरंजन कर्मफळे रसमय मिळवाया रत्नत्रय दीपक उजळाया व्यवहाराचा जम बसवाया मुक्तछ्न्द तम भ्रम पळवाया जीवाचा अभ्युदय व्हाया

  • विलय – VILAY (MERGENCE)

    स्वर परिमल मम वेड लावतो ….. सहज वाहतो काव्यकलेतुन ….. अक्षर अक्षर वेचून मी मग….. एक गुंफते मोतीमाला…. स्वराक्षरातून नाद अंतरी उमटत जातो…. वलय वाढते…. विलय पावते काठावरती ….. तृणांकुरांवर…. दव बिंदूंसम…. ……

  • राग – RAAG (MELODY)

    लेखणी शमा रमा कमल कुसुम ठाकले शेर चंद्रमा निशा दार जाम लागले मुक्तकात भूप तो राग गातसे कुणी साथ देश ईश्वरी पार होत हासले

  • चंद्रार्क तनु – CHANDRAARK TANU (MOON BEAM )

    जिनसूर्य तू जिनचंद्र तू जिनबिंब तू मम अंतरीच्या भावरंगी चिंब तू मी मोजते ना बीजपंक्ती अर्थदा आरक्तवर्णी फाकले डाळिंब तू उत्सर्पिणी अवसर्पिणी काळातल्या चंद्रार्क तनुवर सिद्धस्वरुपी टिंब तू नांदावया अंकांसवे स्वर अक्षरे काट्यांत मी जो नेसले तो लिंब तू दाटून अंतर गीत झरता भावना ग्रंथीत उरले बीजरूपी डिंब तू वाळून जाता शाकभाज्या माळवी घोळून तिखटी…